For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जुना कळंबा नाका ते आयटीआय रस्त्यालगत कचरा

01:15 PM Apr 11, 2025 IST | Radhika Patil
जुना कळंबा नाका ते आयटीआय रस्त्यालगत कचरा
Advertisement

कोल्हापूर / धीरज बरगे : 

Advertisement

जुना कळंबा नाका ते आयटीआयपर्यंतच्या रस्त्यालगतची मोकळी जागा सध्या डंपिंग ग्राऊंड झाली आहे. कोणीही यावे अन् कचरा टाकून जावे, अशी अवस्था दिसते आहे. ठिकठिकाणी कचाऱ्याचे ढिग साचले आहेत. तर काही ठिकाणी जनावरांचे मलमूत्र टाकले जात आहे. या मार्गावर कचरा टाकल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. मात्र नागरिकांकडून आदेश धाब्यावर बसवत येथे कचरा टाकला जात आहे.

कोल्हापूर-गारगोटी राज्यमार्गावर जुना कळंबा नाका ते आयटीआयपर्यंत रस्त्याच्या डाव्या बाजूला कळंबा जेल, तपोवन शाळेची जागा आहे. रस्त्यालगतची ही जागा मोकळी आहे. ती सद्यस्थितीत कचरा टाकण्याचे ठिकाण झाली आहे. त्यामुळे या मार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग तयार झाले आहेत. येथील कचऱ्याकडे महापालिका प्रशासनाचे दूर्लक्ष होत आहे. केवळ कळंबा जेलच्या जागेत पडलेल्या कचऱ्याचा उठाव केला जात आहे. मात्र येथे पुन्हा लगेचच कचऱ्याचा ढिग साचत आहेत.

Advertisement

  • मनपाचा कारवाईचा आदेश धाब्यावर

या मार्गावर ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाल्याने महापालिकेने येथे काही ठिकाणी कचरा टाकल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, अशा इशारा देणार फलक उभारला आहे. मात्र कारवाईचा आदेश असणाऱ्या या फलका लगतच कचऱ्याचे ढिग आहेत. त्यामुळे मनपाचा कारवाईचा आदेश येथे कचरा टाकणाऱ्यांनी धाब्यावर बसवला आहे. तसेच फलकालगत बरेच दिवस कचरा तसाच पडून आहे. यावरुन उघड्यावर पडणाऱ्या कचऱ्याबाबत मनपा प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

  • तपोवन शाळेलगत जनावरांचे मलमूत्र

मार्गावर असणाऱ्या तपोवन शाळेलगत काही ठिकाणी गाय, म्हैस अशा जनावरांचे मलमूत्र टाकले जात आहे. येथे शेणाचे ढिग साचले आहेत. पदपथ लगतच जनावरांचे मलमूत्र टाकले जात आहे. या पदपथावरुनच शाळेचे विद्यार्थी ये-जा करत असतात. पदापथालगतचे कचऱ्याचे, शेणाचे ढिग असे विदारक चित्र पाहून विशेषत: पालकांमधून संताप व्यक्त होत आहे.

  • कचऱ्याच्या ढिगाला आग, झाडांचे नुकसान

तपोवन शाळेच्या परिसरात पदपथलगत मोठयाप्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. झाडांच्या या वर्दळीमध्येही कचऱ्याचे ढिग साचले आहेत. या ढिगांना आग लावण्याचा प्रकार घडत आहे. गणेश कॉलनीसमोर अशाच पद्धतीने लागलेल्या आगीमध्ये बाभळीचे झाड पडले आहे. तर त्या पुढील बाजूसच आणखी एका झाडाचा बुंधा जळाला आहे. त्यामुळे कचऱ्याच्या ढिगाला लागलेल्या आगीमध्ये येथील झाडांचे नुकसान होत आहे.

  • बड्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्यावेळीच स्वच्छता

जुना कळंबा नाका ते आयटीआयपर्यंत रस्त्यालगतचे चित्र विदारक आहे. मात्र येथील कचऱ्याचे कोंडाळे, जनावरांचे मलमूत्र याकडे मनपा प्रशासनाचे साफ दूर्लक्ष होत आहे. तसेच पाईपलाईन टाकण्यासाठी पदपथालगत रस्त्याची खुदाई केली आहे. मात्र खुदाईनंतर पॅचवर्क न केल्यामुळे येथे तण वाढत आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकी दरम्यान तपोवन मैदान येथे झालेल्या बड्या राजकीय नेत्यांच्या दौऱ्या दरम्यान येथे महापालिकेने स्वच्छता केली. इतरवेळी येथील कचरा, मलमूत्राकडे साफ दूर्लक्ष होत आहे.

Advertisement
Tags :

.