मुंबईत गणपती विसर्जन मिरवणुका जल्लोषात
‘बाप्पा मोरया’च्या जयघोष’ : ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण
मुंबई दि.
साश्रूनयनांनी गणरायाला निरोप देण्यासाठी मुंबईत मोठी गर्दी उसळली. ढोल -ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘मुंबईच्या राजा’ची सकाळी 8 वाजता विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरूवात झाली. त्यानंतर निघालेल्या लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी, त्याला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्तांचा सागर लोटला आहे. चिंतामणी, नरेपार्कचा राजा, परळचा महाराजा, परळचा सम्राट आणि परळच्या लंबोदराची विसर्जन मिरवणूक तेजुकायाचा राजा, रंगारी बदक चाळ अशा एकामागोमाग एक गणपतीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या.
श्रॉफ बिल्डिंगजवळ गणपती बाप्पावर पुष्पववृष्टी
गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान श्रॉफ बिल्डिंगजवळ भक्तिमय वातावरण पाहायला मिळालं. श्रॉफ बिल्डिंग जवळ येणाऱ्या प्रत्येक गणपती मिरवणुकीवर गुलाल आणि फुलांची उधळण केली जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष आणि फुलांची उधळण यामुळे हा परिसर भक्तीमय झाला.
गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनाची सुरूवात
गिरगाव चौपाटीवर सकाळीच गणेश विसर्जनाला सुरूवात झाली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी पोलिसांचा भव्य रूट मार्च काढण्यात आला. गिरगाव चौपाटी परिसरात घरगुती गणपती विसर्जनाला सुऊवात झाली आहे. टाळ-मफदुंगाच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात भाविक आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत. विसर्जन सोहळा शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांकडून देखील कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि रूट मार्च काढण्यात येत आहे. पोलिसांच्या वाहनांचा ताफा सायरन वाजवत परिसरात गस्त घालत असून भाविकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, ठाण्यात गणरायासमोर महिलांचे साकडे
ठाण्यातील संत ज्ञानेश्वर नगर येथील सार्वजनिक उत्सव मंडळ आणि शिवसेना शाखेच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त लाडक्या गणरायाच्या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून गणरायाची आरती केली. आरतीनंतर उपस्थित महिलांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, यासाठी गणरायासमोर साकडे घातले. महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळावे, अशी भावना यावेळी महिलांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना महिला संघटिका संत ज्ञानेश्वर नगर येथील दिपाली कराळे यांच्या वतीने करण्यात आले होते. यावेळी शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती यांच्यासह महिला पदाधिकारी, नागरिक आणि गणेशभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गिरगाव चौपाटीवर उपस्थित
मुंबईतील गणरायांना निरोप देण्यासाठी आणि भाविकांचे स्वागत करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्यासह अनेक नेते गिरगाव चौपाटीवर उपस्थित होते.