रेल्वेतून 29 किलो वजनाचा गांजा जप्त शालिमार-वास्को एक्स्प्रेसमध्ये कारवाई
06:43 AM Aug 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
त. भा. प्रतिनिधी
Advertisement
बेळगाव : रस्त्याने अमलीपदार्थांची वाहतूक करताना कारवाई केली जात असल्याने मागील काही दिवसात मोठ्या प्रमाणात रेल्वेने वाहतूक होत आहे. शालिमार ते वॉस्को (अमरावती एक्स्प्रेस) मधून तब्बल 14 लाख 92 हजार 250 रुपये किमतीचा 29.845 किलो गांजा जप्त करण्यात आला. बेळ्ळारी रेल्वेस्टेशननजीक जनरल कोचमध्ये प्रवाशांच्या सीटखाली दोन बेवारस ट्रॉली बॅग निदर्शनास आल्या. काही प्रवाशांनी याची माहिती पोलिसांना देताच रेल्वेच्या डब्याची तपासणी करण्यात आली. बॅगांमध्ये बांधून ठेवण्यात आलेली गांजाची पाकिटे सापडली. अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Advertisement
Advertisement