For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गुंड विशालसिंग चव्हाणला गुंडा कायद्याखाली अटक

12:56 PM May 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
गुंड विशालसिंग चव्हाणला गुंडा कायद्याखाली अटक
Advertisement

गुलबर्गा कारागृहात स्थानबद्ध : पोलिसांच्या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले

Advertisement

बेळगाव : कुख्यात गुंड विशालसिंग चव्हाण याला गुंडा कायद्याखाली अटक करण्यात आली आहे. खडेबाजार पोलिसांनी मंगळवारी ही कारवाई केली असून त्याला गुलबर्गा येथील कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले आहे. बेळगाव पोलिसांच्या या कारवाईने गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. विशालसिंग विजयसिंग चव्हाण (वय 28) रा. शास्त्राrनगर असे त्याचे नाव आहे. पोलीस उपायुक्त व विशेष दंडाधिकारीही असलेले रोहन जगदीश यांनी यासंबंधीचा आदेश बजावला आहे. विशेष दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर खडेबाजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र व त्यांच्या सहकाऱ्यांनी बुधवारी विशालसिंगला गुलबर्गा येथे हलविले आहे. आपल्या गुन्हेगारी कारवायांनी सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर तो पोलिसांसाठीही डोकेदुखी ठरला होता. खून, खुनी हल्ला, अपहरण आदी 13 हून अधिक गुन्हे त्याच्यावर महाराष्ट्र व कर्नाटकात नोंद आहेत. काही प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर कोर्टात सुनावणीला हजर रहायचा. उपलब्ध माहितीनुसार खडेबाजारचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र यांनी यासंबंधीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त व विशेष दंडाधिकारी रोहन जगदीश यांच्याकडे पाठविला होता. त्यानंतर विशालसिंगवर गुंडा कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे. गेल्याच आठवड्यात शास्त्राrनगर परिसरातील एका तरुणाला विशालसिंगने धमकावल्याची घटना घडली होती. त्याला पोलिसांनी गुंडा कायद्याखाली अटक केली आहे.

पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्याने कारवाई

Advertisement

रियल इस्टेट व्यावसायिक व बिल्डर राजू दो•बोम्मण्णावर खून प्रकरणानंतर विशालसिंग फरारी झाला होता. दि. 21 जून 2022 रोजी वीरभद्रनगर परिसरात तत्कालिन एसीपी नारायण बरमणी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. खून प्रकरणात जामिनावर सुटका झाल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या होत्या. अखेर त्याच्यावर गुंडा कायद्याखाली कारवाई करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.