For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काऊंटर

07:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काऊंटर
Advertisement

वृत्तसंस्था /लखनौ

Advertisement

उत्तर प्रदेशातील एक कुख्यात गुंड शाहनूर ऊर्फ शानू याला एन्काऊंटरमध्ये ठार करण्यात आले आहे. त्याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास 1 लाख रुपयाचे इनाम घोषित करण्यात आले होते. शाहनूर हा गेल्या सहा महिन्यांपासून बेपत्ता होता. जिल्हा पोलिस प्रमुख अशोककुमार मीना यांनी गुरुवारी ही माहिती दिली. शाहनूर हा मूळचा उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्याचा रहिवासी होता. त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्हे आहेत. तो गेल्या दोन वर्षांपासून पोलिसांच्या हाती सापडत नव्हता. त्याची दहशत खाल्लेले नागरिकही त्याची माहिती देण्यास तयार नव्हते. त्यामुळे त्याची माहिती देणाऱ्यास इनाम घोषित करण्यात आले होते.  तो एका खेड्यात लपल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून कळताच, पोलिसांनी या गावाला वेढा देऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. उलट त्याने गोळीबार सुरु करताच पोलिसांनी प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात तो ठार झाला आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.