For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सांगलीमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत गुंडाचा निघृण खून; हल्लेखोर झाले प्रसार

12:59 PM Sep 15, 2026 IST | YOGESH KANGUDE
सांगलीमध्ये गणेश आगमन मिरवणुकीत गुंडाचा निघृण खून  हल्लेखोर झाले प्रसार
Advertisement

सांगली: गणेश आगमन मिरवणुकीचा जल्लोष सुरू असतानाच माधवनगरमध्ये गुंड बसवराज कळलपा आडगाळे (वय ३०, रा. अहिल्यानगर, कुपवाड) याचा पूर्ववैमनस्यातून निघृण खून झाला. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास आर सिटी मॉलसमोर हा थरारक प्रकार घडला.

Advertisement

या खुनाप्रकरणी शैलेश पडळकर आणि त्याचे चार साथीदार संशयाच्या भोवऱ्यात असून, घटना घडल्यानंतर सर्वजण पसार झाल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. गणेश आगमन मिरवणुकीमुळे माधवनगर परिसरात मोठी गर्दी होती. ढोल-ताशांचा गजर, गणेशभक्तांची लगबग आणि मिरवणुकीचा उत्साह सुरू असतानाच आर सिटी मॉलसमोर बसवराज आडगाळे याच्यावर हल्ला करण्यात आला, अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही का प्रचंड गोंधळ उडाला. हल्ल्यानंत संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले.

घटनेची माहिती मिळताच संजयनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बयाज कुरळे यांच्या मार्गदर्शनाखाल पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थल दाखल झाले. पोलिसांनी परिसराच पाहणी करून तपासाला सुरुवात केव आहे. संशयितांचा शोध घेण्यासा पोलिसांची पथके रवाना करण्या आली असून, मिरवणुकीदरम्या घटनास्थळी उपस्थित असलेल् नागरिकांकडूनही माहिती घेतल जात आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.