गँगस्टर अबु सालेमची सुटण्यासाठीची धडपड!
देशात बॉम्बस्फोट, हत्या, हत्येचा प्रयत्न तसेच खंडणीसारखे गुन्हे दाखल असलेल्या गँगस्टर अबु सालेमची गेली 25 वर्षे तपास यंत्रणांनी चांगलीच बडदास्त ठेवली आहे. पोलंड सरकारकडून प्रत्यार्पण करार करताना अबु सालेमला कोणताही त्रास होता कामा नये तसेच यासारख्या अनेक अटी-शर्थी मान्य केल्या होत्या. त्यातीलच एक शर्थ म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त काळ कारागृहात ठेवू नये. नेमकी हीच शर्थ पूर्ण झाल्याने सालेमने कारागृहाबाहेर येण्यासाठी धडपड सुऊ केली आहे.
देशाच्या आर्थिक राजधानीत 12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात सामील असलेल्या अनेक गँगस्टरांनी देश सोडून दुबईचा आश्रय घेतला. तर काहींनी दुबई सोडून दुसऱ्या देशाचा आश्रय घेतला. दाऊद आणि टायगर मेमनच्या कुटुंबियांनी पाकिस्तान गाठले. तर यातील आणखी एक गँगस्टर असलेल्या अबु सालेमने पोलंड गाठले. तपास यंत्रणांनी त्याच्या मुसक्या आवळून देशात आणले, मात्र पोलंड सरकारच्या अटींवर. ही अट म्हणजे पोलंड देशाचे नागरिकत्व घेतलेल्या अबु सालेमचे प्रत्यार्पण भारताकडे कऊ मात्र देशाने त्याच्यावर चालविण्यात येणाऱ्या गुह्यावर त्याला फाशीची शिक्षा देऊ नये. तसेच 25 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्याला देण्यात येऊ नये, या अटीशर्थीवर सालेमला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यातच ही पंचवीस वर्षे पूर्ण झाल्याने, अबु सालेमने कारागृहातून बाहेर येण्यासाठी धडपड करण्यास सुऊवात केली आहे. यासाठी त्याने कायद्याचाच म्हणजे न्यायालयाचा आधार घेतला आहे.
त्या आधारे त्याने उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. याचिकेत एकूण शिक्षा तसेच कच्चा कैदी म्हणून घालवलेला कालावधी आणि मिळवलेल्या माफीचा समावेश हा कार्यकाळ 25 वर्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा सालेमने केला आहे. त्याच्या याचिकेनुसार, 24 डिसेंबर 2024 पर्यंत, त्याने दोन प्रकरणांमध्ये झालेली एकूण शिक्षा म्हणून 25 वर्षांहून अधिकचा तुऊंगवास भोगला आहे. नोव्हेंबर 2005 ते सप्टेंबर 2017 पर्यंत त्याने खटला निकाली निघेपर्यंत 11 वर्षे 9 महिने आणि 26 दिवस तुरूंगात काढली. तर फेब्रुवारी 2015 ते डिसेंबर 2024 दरम्यान 2006 च्या टाडा प्रकरणात दोषी म्हणून नऊ वर्षे 10 महिने आणि 4 दिवस तुरूंगात घालवले आहेत. याशिवाय, 2006 च्या प्रकरणात चांगल्या वर्तनासाठी त्याला तीन वर्षे 16 दिवसांची माफी मिळाली आहे. पोर्तुगालमध्ये खटल्यात घालवलेल्या कालावधीसाठी सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक महिन्याची सूट दिल्याचेही सालेम याने याचिकेत म्हटले आहे. तसेच, उपरोक्त कालावधीची बेरीज केल्यास 2024 च्या अखेरीस, त्याने एकूण 24 वर्षे 9 महिन्यांहून अधिक काळ तुऊंगवास भोगल्याचा दावा केला आहे. याशिवाय, पोर्तुगालमधून त्याच्या प्रत्यार्पणादरम्यान दिलेल्या आश्वासनांचे उल्लंघन झाल्याचा दावाही सालेम याने याचिकेत केला आहे. तसेच शिक्षा पूर्ण भोगल्यानंतरही तुऊंगात ठेवणे हे भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अन्वये वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन असल्याचा दावादेखील केला आहे.
म्हणजे या अबु सालेमने याच देशात जन्म घेतला आणि याच देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परीस्थितीला खिंडार पाडत अनेक नागरिकांचे बळी घेतले. तसेच अनेकांना धमकाविले, अनेकांवर हल्ले करीत दुसऱ्या देशात आश्रय घेतला. त्यानंतर याच देशाचा आधार घेत ज्या देशात जन्म घेतला त्या देशाने कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. याला काय म्हणावे, चोराच्या उलट्या बोंबा म्हणजे असे की, कोणताही गुन्हा करा, दुसऱ्या देशात आश्रय घ्या आणि प्रत्यार्पण कऊन आणल्यानंतर यांची बडदास्त अगदी जावयासारखी करा. वऊन हे देशाला नावे ठेवणार. अशा देशद्रोह्यांना पुन्हा मोकाट सोडायचे का? असा विचार करणे आवश्यक आहे. यापूर्वी त्याला बांधकाम व्यावसायिक प्रदीप जैन याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरविले होते. मात्र त्याला शिक्षा देताना देखील न्यायालयाला प्रत्यार्पणाच्या अटी शर्थींचा विचार करावा लागला होता. अबु सालेमला भारतीय तपास यंत्रणांनी अटक केली नाही. तर त्याला पोर्तुगालमध्ये पोर्तुगाल पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर भारत सरकारने पोर्तुगाल सरकारशी गुन्हेगार प्रत्यार्पण करार करीत 2005 साली अबु सालेम आणि त्याची तथाकथीत प्रेयसी मोनिका बेदीचा ताबा घेतला होता. मात्र अबु सालेमला भारतीय तपास यंत्रणांच्या ताब्यात देताना पोर्तुगाल सरकारने अनेक अटी घातल्या होत्या. सालेमला थोडा जरी त्रास झाला तरी, तो पोर्तुगाल सरकारकडे त्याच्या वकीलांच्या मार्फत देशातून हलविण्याची गुहार लावत आहे. यामुळे सालेमला कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी तपास यंत्रणा घेत आहेत. तर कायद्याचा दुऊपयोग तपास यंत्रणांच्या ताब्यात नसताना देखील सालेम करीत होता, आणि आता तपास यंत्रणांच्या ताब्यात असताना देखील तो करीत आहे. यामुळे भारत सरकार अबु सालेम सारख्या गँगस्टरची बडदास्त एखाद्या जावयासारखी करीत आहे.
उत्तर प्रदेशातील अब्दुल कयीम अन्सारी उर्फ अबु सालेम हा पोटापाण्यासाठी आझमगड सोडून मुंबईत आला. सालेमने अनेक ठिकाणी काम केल्यानंतर पासपोर्ट बनविण्याचा व्यवसाय सुऊ केला. सालेमची ओळख अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम याचा भाऊ अनिस इब्राहीमशी झाली. येथूनच तो अंडरवर्ल्डमध्ये पूर्णत: सक्रीय झाला. अशातच 1993 साली गुजरातहून आलेला शस्त्रांचा साठा सालेमने हनिफ कडावाला, समिर हिंगोरा, बाबा चव्हाण आणि बॉलिवुड अभिनेता संजय दत्त यांना पोहचविला होता. मात्र 1993 च्या बॉम्बस्फोटानंतर पोलिसांचा ससेमिरा सालेमच्या मागे लागल्याने त्याने तत्काळ मुंबई सोडून
दुबई गाठली. त्यानंतर त्याने चित्रपट अभिनेत्री मोनिका बेदीसह पोलंड गाठले. मात्र, सालेम मोनिका बेदीसह पोर्तुगालमध्ये असल्याची भणक इंटरपोलला लागली. त्यांनी तत्काळ याची माहिती पोर्तुगाल पोलिसांना दिली. पोर्तुगाल पोलिसांनी 2001 साली अचानक सालेमच्या घरी धाड टाकत मोनिका बेदीसह अटक केली. भारत सरकारने पोर्तुगाल सरकारशी संपर्क साधला. बऱ्याच विचार-विनिमयानंतर पोर्तुगाल आणि भारत सरकारमध्ये गुन्हेगार प्रत्यार्पण करार करण्यात आला. त्यानुसार पोर्तुगाल सरकारने अनेक अटी घातल्यानंतर सालेमसह मोनिका बेदीचा ताबा केंद्रीय अन्वेषण विभागाकडे दिला. 8 गुह्याखेरीज आणखी गुन्हे सालेमवर दाखल करता येऊ नये. तसेच त्याला फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये. त्याचप्रमाणे 25 वर्षापेक्षा जास्त शिक्षा त्याला ठोठाविण्यात येऊ नये. अशा प्रकारच्या अटी पोर्तुगाल सरकारने घातल्याने, सालेमची बडदास्त भारत सरकारने अगदी जावयासारखी ठेवण्यास सुऊवात केली आहे. अशातच त्याने कारागृहातील 25 वर्षे पूर्ण झाल्याने सुटकेसाठी धडपड करण्यास सुऊवात केली आहे. ही धडपड यशस्वी झाली तर एकदा गुन्हेगार कारागृहातून बाहेर आल्यावर तो कोणत्या मार्गाने जातो हे समजण्यापुरते नागरिक सुज्ञ आहेत.
- अमोल राऊत