सामाजिक प्रश्नांकडे लक्ष वेधणारे गंगावेश संयुक्त मंडळ ! गणेशमूर्तीतूनच जाणिवा जाग्यात करत प्रबोधनाचा डोस
यंदा बलात्कारी नराधमाचा वध करणाऱ्या श्रीराम ऊपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना
संग्राम काटकर कोल्हापूर
गणेशोत्सवात देखाव्यातून प्रबोधनाचा डोस देण्यामध्ये कोल्हापुरी मंडळे अग्रेसर आहेत. काही वर्षांपूर्वी अनेक मंडळांनी जनजागृतीपर केलेले देखावे आजही गणेशभक्तांच्या लक्षात आहेत. गंगावेशजवळील गंगावेश संयुक्त मित्र मंडळाने तर सामाजिक जाणिवा जाग्या करण्यात आघाडी घेत आम्हाला गणेशभक्तांना टाळता येणार नाही, असे वलय बनवले आहे. हे मंडळ ना सजिव देखावा करते, ना तांत्रिक देखावा. मात्र राज्यात, देशात घडलेल्या घटनांकडे लक्ष वेधत जो संदेश द्यायचा आहे, त्याला अनुसऊनच गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना कऊन जाणिवा जाग्या करत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात बलात्काऱ्याचा वध करणारी श्रीराम ऊपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करत ‘नो रेप’चा बोलका संदेश दिला आहे. या आणि अशा अनेक संदेशपर थीम घेऊन गेल्या आठ वर्षात मंडळाने गणेशमूर्तीतून दिलेल्या संदेशावर टाकलेला दृष्टीक्षेप असा...
जातीवाद नष्ट करण्यासाठी पुढे सरसावलेले राजर्षी...
समाजात घडणाऱ्या जातीवादावर लक्ष केंद्रीत मंडळाने 2017 साली अस्पृश्यता निवारणचा संदेश देणाऱ्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. संदेशासाठी राजर्षी शाहू महाराजांच्या ऊपातील गणेशमूर्ती बनवली होती. गंगाराम कांबळे यांच्याकडून राजर्षी शाहू हे चहा घेतानाच गंगाराम यांच्याच हातून चहा घेण्यास इतरांना सांगत आहेत असे दृश्य गणेशमूर्तीतून दाखवत अस्पृश्यता मोडण्याचा संदेश दिला होता.
आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याला रोखताना गणेश...
कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या ही आव्हानात्मक परिस्थिती बनली आहे. अशा परिस्थितीत हे बळीराजा सशक्त हो. तुझ्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे, आत्महत्या न करता नव्या उमेदीने शेतीकामाला लाग अशी भावनिक हाक देणाऱ्या गणेशमूर्तीची मंडळाने 2018 साली प्रतिष्ठापना केली होती. गळफासाला लटलेल्या शेतकऱ्याला अधांतरीत उचलताना जीवदान देताना गणेशमूर्ती असे दृश्य दाखवले होते. गंगावेस, रंकाळावेसमध्ये कामांच्यानिमित्ताने बाहेर गावांचे येणाऱ्या शेतकरी बांधवांनी ही मूर्ती पाहण्यासाठी गर्दी केली होती.
कोरोनातील फलक ठरला लक्षवेधी...
कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये जीव धोक्यात घालून डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार रस्त्यावर हेते. या सर्वांनी जबाबदारी कशी पार पाडली पटवून देण्यासाठी 2021 साली मंडळ परिसरात मोठे डिजीटल फलक उभारले होते. त्यावर लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी सक्रीय असलेला पोलीस बाप्पांच्या ऊपात, कोरोना पॉझिटीव्ह ऊग्णावर उपचार करणारा डॉक्टर बाप्पांच्या ऊपात आणि रोगराई रोखण्यासाठी औषध फवारणी करणारा कामगार बाप्पांच्या ऊपात दाखवला होता.
बाप्पांमधून घडवले विठ्ठल-ऊक्मिणीचे दर्शन...
कोल्हापूर ते प्रतिपंढरपूर नंदवाळ या पायी दिंडीमुळे आषाढी एकादशीला कोल्हापूरात पंढरपूरसारखेच वातावरण तयार होते. हा धागा पकडून मंडळाने 2023 साली विठ्ठल ऊपातील गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. भाविकांना दर्शन घेतेवेळी पंढरीची आठवण व्हावी म्हणून पंढरपूरातील विठ्ठल मंदिराची प्रतिकृती उभारली होती. या प्रतिकृतीमध्ये चक्क चंद्रभागा नदीचे पाणी आणून ठेवले होते. मंदिराची प्रतिकृती व चंद्रभागेच्या पाण्याचीही चर्चेचा विषय बनली होती.
बलात्काराच्या वध करताना गणेशमूर्ती...
दिल्लीपासून ते कोलकाता बलात्कारासारख्या घटनांनी सारा देश हादऊन गेला आहे. बलात्कार घटनेची वार्ता जरी कानी पडली तरी माणसांची मन कोलमडतात. हा प्रकार थांबावा, नराधमाला मृत्युदंडच व्हावा, असे सांगणाऱ्या श्रीराम ऊपातील गणेशमूर्तीची मंडळाने यंदा प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्ती भोवतीने नो सेप, नो रेप अॅण्ड नो ड्युटीचा संदेश देणारे नेपथ्य उभारले आहे. महिला सुरक्षित नसतील त्या नोकरी कशा करतील अशी विचारणाही मंडळ करत असून महिला, मुलींनी गणेशमूर्ती पाहावी, अशा पद्धतीने बनवली आहे.
गणेशभक्तांचा मिळतोय प्रतिसाद....
महाराष्ट्रात आणि देशात काय घडले आहे, यावर गणेशोत्सवाच्या आधी महिना दोन महिने मंडळाचे कार्यकर्ते चर्चा करतात. या चर्चेतून कोणता संदेश द्यायचा याची थीम कार्यकर्ते बनवतात. ही थीम घेऊनच मूर्तीकारांकडून गणेशमूर्तीही बनवून घेतली जाते. गणेश मंडपातील नेपथ्यही कार्यकर्ते कल्पकतेने बनवतात. 2019 साली झाडे लावा आ]िण 2021 साली वृद्धाश्रमाची थीम घेऊन मांडलेल्या देखाव्याला गणेशभक्तांचा मोठा प्रतिसाद मिळाला होती.
संदीप शिंदे (अध्यक्ष : गंगावेश संयुक्त मित्र मंडळ)