कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गंगाराम गवाणकरांनी भूषविले होते सावंतवाडीतील साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद

05:49 PM Oct 28, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

कोमसापच्या पदाधिकाऱ्यांनी जागवल्या संमेलनाच्या आठवणी

Advertisement

सावंतवाडी प्रतिनिधी

Advertisement

कोकण मराठी साहित्य परिषदचे संस्थापक अध्यक्ष मधू मंगेश कर्णिक आणि वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांचे नाते अतूट होते. कोकण मराठी साहित्य परिषद सावंतवाडी शाखा संयोजनातर्फ सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा साहित्य संमेलन 22 मार्च 2025 रोजी सावंतवाडीत झाले. या संमेलनाचे अध्यक्ष वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर यांनी भुषवले होते. सिंधुदुर्गात सावंतवाडी येथे कित्येक वर्षानंतर प्रथमच कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी साहित्य संमेलन झाले. या संमेलनात अध्यक्ष स्थानावरून बोलताना वस्त्रहरणकार यांनी वस्त्रहरण मधील परदेशवारीची आठवण करून दिली होती. त्या परदेशवारीतील अनेक किस्से उलघडले होते.मालवणी भाषा टिकायला हवी. असा सूर त्यांनी या संमेलनात आळवला होता. या संमेलनात वस्त्रहरणकार गवाणकर यांनी संपूर्ण दिवसभर उपस्थिती दर्शवली होती . ग्रंथ दिंडीमध्ये ते सहभागी झाले होते.त्यांच्या अध्यक्षतेखाली साहित्य संमेलन सावंतवाडीत झाले. त्यामुळे या साहित्य संमेलनाला वेगळीच उंची प्राप्त झाली. पालकमंत्री नितेश राणे यांनी या संमेलनात सिंधुदुर्गात मालवणी भाषेचे साहित्यिक भवन उभारून कोकणचे साहित्य जतन करण्याची जबाबदारी आमची सर्वांची आहे. गंगाराम गवाणकर यांच्यासोबत आपल्याला बसता आले हे माझे भाग्य आहे अशा शब्दात उद्गार काढले होते. या संमेलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक प्रदीप ढवळ ,अध्यक्ष नमिता कीर यांची उपस्थिती होती. हे संमेलन वस्त्रहरणकार यांच्या उपस्थितीमुळे आगळे वेगळे ठरले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर यांनी भूषविले. हा बहुमान कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग शाखा आणि सावंतवाडी शाखेला मिळाला हे भाग्यच म्हणायला हवे . जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के यांनी वस्त्रहरणकार यांचा सहवास आम्हाला लाभला. त्यांच्या जाण्याने मालवणी मुलखाचे अतोनात नुकसान झाले आहे . त्यांनी मालवणी भाषा जिवंत ठेवण्याचे काम केले . त्यांच्या जाण्याने साहित्य चळवळीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. कोकण मराठी साहित्य परिषदचे सिंधुदुर्ग शाखेचे सचिव तथा ज्यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी जिल्हा साहित्य संमेलन यशस्वी पार पडले ते माजी अध्यक्ष, जिल्हा सचिव ॲड. संतोष सावंत यांनी सावंतवाडीत आगळेवेगळे आणि न भूतो न भविष्यती असे जिल्हा साहित्य संमेलन अध्यक्ष गंगाराम गावणकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले त्यांचा सहवास आम्हाला लाभला. हे आमचे आणि सावंतवाडीकरांचे भाग्यच म्हणावे लागेल. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले . त्यांच्या जाण्याने नाट्य क्षेत्राचे अतोनात नुकसान झाल्याची भावना व्यक्त केली आहे .

Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # sawantwadi # gangaram gavankar # marathi news #
Next Article