For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Miraj | मिरजेत टोळीयुद्ध भडकले! सराईत गुन्हेगाराच्या भावाचा दोघा तरुणांवर खुनी हल्ला

04:26 PM Apr 01, 2026 IST | NEETA POTDAR
miraj   मिरजेत टोळीयुद्ध भडकले  सराईत गुन्हेगाराच्या भावाचा दोघा तरुणांवर खुनी हल्ला
Advertisement

              मिरजेत दोन गटात तुंबळ हाणामारी; चाकू-कोयत्याने वार

Advertisement

मिरज : पूर्वी झालेल्या भांडणाच्याकारणातून सहा जणांच्या टोळीने दोघा तरुणांना दुचाकीवरुन खाली पाहून खुनी हल्ला केला. डोक्यात बियरच्या बाटल्या फोडण्यासह चाकू व कोयत्याने जबर मारहाण करण्यात आल्याने सुजल दत्तात्रय भोसले (वय १७) व त्याचा मित्र समर्थ गायकवाड असे दोघे जखमी झाले आहेत.

याबाबत सुजल याने महात्मा गांधी चौकी पोलिसात तक्रार दिली असून, संशयीत सहा हल्लेखोरांवर गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये संशयीत सराईत गुन्हेगार एजाग बारगीर, यासिन बारगीर (दोघे रा. जनासाहेब वग्र्याजवळ, मिरज), रेहमान पटेल, अमीर बायु शेख, अल्ताफ उर्फ अन्दर शेख (रा. ख्वों जावस्ती, मिरुज) आणि अकबर (पूर्ण नांव नाही) अशा सहा जणांचा समावेश आहे.

Advertisement

संशयीत एजाज बारगीर हा सराईतगुन्हेगार इशरत बारगीर याचा भाऊ असून, इशरत याला जमावाने मारहाण करुन धिंड काढल्यानंतर त्याच दिवशी रात्री या टोळीने हल्ला केल्याने शहरात टोळी युध्द भडकण्याची शक्यता आहे. यायावत अधिक माहिती अशी, सुजल भोसले हा इचलकरंजी येथे गोंधळाच्या कार्यक्रमाला जात होता. तो छत्रपती शिवाजी रस्त्यावरुन स्टेंडकडे चालत येताना जनावर बाजारासमोर त्याचा मित्र समर्थ गायकवाड दुचाकीवर
थांबला होता. त्यामुळे सुजल हा समर्थ याला स्टैंडजवळ सोडायला सांगून दुचाकीवर बसला होता.

यावेळी संशयीत एजाज बारगीरसह सहा जण जमाव करुन आले. त्यांनी सुजल व समर्थ अशा दोघांना शर्ट पकडून खाली पाडले. आमच्या भावाला मारता काय, असे म्हणून डोक्यात बाटली फोडली. त्यानंतर कोयत्याने व चाकूने हातावर बार करुन गंभीर जखमी केले.

शहरात टोळी युध्दाचा भडका
गुन्हेगार इशरत बारगीर याच्या वादागिरीला कंटाळून जमावाने मारहाण करुन धिंड काढल्यानंतर दोन गटात टोली युध्व भडकले आहे. इशरत बारगीरचा भाऊ एजाज व त्याची टोळी पुन्हा गांजा, गोळ्या व वारुची नशा करुन वहशत करत आहेत. इशरतवर हल्ला करणाऱ्यांचा बदला घेण्यासाठी ते शोध घेऊन ते मारहाण करत असल्याने शहरात वोन गटांत संघर्ष उद्भवला आहे. पोलिसांनी या गुन्हेगारांचा माज उत्तरविण्यासाठी विंड सत्र सुरू केले असतानाही संबंधीत नशेखोर गुन्हे करत फिरत असल्याचे दिसत आहे.

Advertisement
Tags :

.