For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मंदिरांवर घाला घालणाऱ्या चौकडीला अटक

01:23 PM Feb 03, 2026 IST | Tarun Bharat Portal
मंदिरांवर घाला घालणाऱ्या चौकडीला अटक
Advertisement

गोकाक-सौंदत्तीतील मंदिरे लक्ष्य : 9 लाखांचा मुद्देमाल हस्तगत : चार मंदिरे फोडल्याची कबुली

Advertisement

बेळगाव : जिल्ह्यातील मंदिरांना लक्ष्य बनविणाऱ्या एका चौकडीला कुलगोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून 8 लाख 84 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोकाक व सौंदत्ती तालुक्यातील चार मंदिरे फोडल्याची कबुली या चौकडीने दिली आहे. बिराप्पा हणमंतप्पा कत्ती (वय 36), बसवराज भीमाप्पा तळवार (वय 35) दोघेही राहणार इटनाळ, ता. यरगट्टी, भरमाप्पा संगाप्पा लगळी (वय 39) राहणार होनकुप्पी, ता. मुडलगी, विलास लक्ष्मण रसाळ (वय 34) राहणार देऊळघाट, ता. जि. बुलढाणा अशी अटक करण्यात आलेल्या चौघा जणांची नावे आहेत.

या चौकडीने मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 2, सौंदत्ती व कुलगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात प्रत्येकी 1 मंदिरे फोडल्याची कबुली दिली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन, गोकाकचे पोलीस उपअधीक्षक रवी नायक यांच्या मार्गदर्शनाखाली कुलगोडचे पोलीस उपनिरीक्षक बी. आनंद, आर. एस. पुजारी, एस. बी. पाटील, के. सी. बागली, एस. एन. बडबडे, एम. एस. कुरेन्नावर, एस. एफ. मळली व तांत्रिक विभागाचे विनोद ठक्कन्नावर आदींनी ही कारवाई केली आहे. जिल्हा पोलीसप्रमुख के. रामराजन यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.

Advertisement

अवरादी, ता. मुडलगी येथील मदनुराम्मा व श्री शेट्टम्मादेवी मंदिरांचे दरवाजे फोडून देवीच्या गळ्यातील 90 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरण्यात आले होते. यासंबंधी 21 जानेवारी 2026 रोजी श्रीशैल गंगाप्पा पुजेरी (वय 45) राहणार अवरादी यांनी कुलगोड पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. या प्रकरणाचा तपास करताना चौकडीला अटक करून त्यांची कसून चौकशी केली असता चार मंदिरे फोडल्याची कबुली त्यांनी दिली. अवरादी येथील मंदिरातून चोरलेले 10 ग्रॅम सोन्याचे दागिने, मुरगोड पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात दोन मंदिरांतून चोरलेले 1 लाख 29 हजार व 95 हजार 900 रुपये किमतीचे दागिने व सौंदत्ती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील एका मंदिरातून चोरलेले 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने, 3 लाख रुपये किमतीच्या पाच मोटारसायकली व दीड लाख रुपये किमतीची चोरीसाठी वापरलेली कार असा एकूण 8 लाख 84 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.

Advertisement
Tags :

.