प्रवाशांना लुटणारी टोळी 12 तासात जेरबंद
सातारा :
वर्ये (ता. सातारा) गावच्या हद्दीत ठाणे येथील प्रवाशाला लुटणाऱ्या टोळीच्या मुसक्या बारा तासाच्या आत आवळण्यात सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाला यश आले आहे. शाहीद शफिक शेख (वय 38, रा. रुपिनगर निगडी पुणे), विनायक गोवर्धन धाडगे (वय 37, रा. धाडगे मळा नागरदेवळे अहमदनगर) अशी त्यांची नावे आहेत.
सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या डी. बी. पथकाने या गुह्यातील आरोपीची माहिती मिळवुन दोन संशयित इसम यांना किणी वाठार, कोल्हापुर येथुन ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गुह्याच्या अनुशंगाने चौकशी केली असता चौकशी दरम्यान संशयितांनी तक्रारदार यांची रोख रक्कम व मोबाईल फोन चोरुन घेऊन गेल्याची कबुली दिली. तसेच आरोपी यांच्याकडून रोख रक्कम व मोबाईल फोन ताब्यात घेऊन या गुन्ह्यामधील दोन संशयितांना अटक केली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर, डीवायएसपी राजीव नवले, सातारा तालुका पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे, अनिल मोरडे, श्री. एस. एस. काटकर, पोलीस हवालदार राजु शिखरे, मालोजी चव्हाण, दादा स्वामी, पोलीस नाईक प्रदिप मोहिते, सतिश बाबर, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी डफळे, संदिप पांडव, धिरज पारडे, सचिन झनकर, रोहित बाबर व चालक सहायक फौजदार माने यांनी केलेली आहे. या गुन्हयाचा अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक व्ही. बी. नेवसे हे करीत आहेत.