Crime News : ट्रान्सफॉर्मरमधील तांबे चोरणारी टोळी जेरबंद
10:15 AM Sep 01, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
४ लाख ७५ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
Advertisement
सातारा : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली पाडून त्यामधील तांब्याच्या तारांची चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन संशयित आरोपींना जेरबंद करण्यात आले असून, त्यांच्या चौकशीत पुसेगाव, खंडाळा, शिरवळ आणि लोणंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील चोरीचे तब्बल १६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
पोलिसांनी या कारवाईत ४ लाख ७५ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये विशाल शरद पवार (वय ३५, रा. तरडगाव, ता. फलटण, जि. सातारा), साहील उर्फ शक्तीमान उर्फ चुचन लेमन पवार (वय २२, रा. विटभट्टीजवळ निरा, ता. पुरंदर, जि. पुणे), अदित लेमन पवार (वय २५, मुळ रा. निरा, सध्या रा. पवाराची निगडी ता. जि. सातारा) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, महावितरणचे ट्रान्सफॉर्मर पाडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी या गुन्ह्यांचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या.
त्यानुसार पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव यांच्या अधिपत्याखाली विशेष तपास पथक तयार करण्यात आले. दरम्यान, २० ऑगस्ट रोजी पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना गोपनीय माहिती मिळाली की, महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी करणारे तिघे शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात येणार आहेत. त्यानुसार तपास पथकाने परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच संशयीतांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या सखोल तपासात आरोपींनी पुसेगांव, खंडाळा, शिरवळ आणि लोणंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारे ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याचे समोर आले. तपासात एकूण १६ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून ४ लाख ७५ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
Advertisement
चौकशीत १६ गुन्ह्यांची कबुली
पोलीस कोठडीदरम्यान केलेल्या सखोल तपासात आरोपींनी पुसेगांव, खंडाळा, शिरवळ आणि लोणंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीत अशाच प्रकारे ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी केल्याचे समोर आले. तपासात एकूण १६ गुन्हे उघडकीस आले असून, आरोपींकडून ४ लाख ७५ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.