For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Pandharpur : पंढरपुरातील सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार

05:40 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
pandharpur   पंढरपुरातील सराईत गुन्हेगारांची टोळी जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार
Advertisement

                 पंढरपूरात दहशत माजवणाऱ्या टोळीवर पोलिसांची कडक कारवाई

Advertisement

पंढरपूर : शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे अभिलेखावरील सहा सराईत गुन्हेगारांची टोळी एक वर्षासाठी सोलापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके यांनी दिली.

पो.नि. घोडके म्हणाले, शहर पोलीस ठाणे हद्दीतील गंभीर गुन्हे करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगार आणि टोळी प्रमुख राजेंद्र उर्फ हॅनी गौतम कावरे, अक्षय हरीभाऊ गवळी उर्फ अक्षय जुमाळे (रा. दोघे हनुमान मैदानाजवळ, जुन्या कोर्टाचे पाठीमागे, पंढरपूर), दर्शन उर्फ कौस्तुभ संतोष बंडगर, कार्तिक नागेश सुरवसे(रा. दोघे धुंडा महाराज मठासमोर, पंढरपूर), ओम उर्फ ओके गणेश कोळी उर्फ जाधव (रा. गांविदपुरा पंढरपूर सध्या, रा. शिवाजीनगर, जळगाव), पवन अनिल अधटराव (रा. मटण मार्केटजवळ पंढरपूर) यांच्यासह सहा जणांविरूध्द दोन पेक्षा जारत गुन्हे दाखल असल्यामुळे हद्दपारीचा प्रस्ताव तयार करुन हद्दपारीचे कारवाईबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला होता.

Advertisement

दरम्यान अहवालानुसार येथील उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी हद्दपार करण्यासंदर्भातील काम चालवून अहवाल जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे सादर केला होता.

Advertisement
Tags :

.