कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अधिकारी असल्याचे भासवून फसवणारी टोळी जेरबंद

10:24 AM Oct 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेंगळूर पोलिसांकडून 16 जणांना अटक : धमकावून लुबाडणूक : आरोपी महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, मध्यप्रदेशातील  

Advertisement

बेंगळूर : पोलीस अधिकारी असल्याचे भासवून अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करून फसवणूक करणाऱ्या टोळीतील 16 आरोपींना गजाआड करण्यात आले आहे. बेंगळूरच्या एचएसआर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. आरोपी महाराष्ट्र, गुजरात व इतर राज्यांमधील असून या टोळीतील इतर आरोपींचा शोध जारी आहे. महादेव सिंग (वय 26), फ्रान्सिस (वय 29), मोहन कनकाई (वय 32), कार्तिक राजू (वय 25), सुनील (वय 30), अरविंद अन्नी पुजारी (वय 31), राकेशकुमार सिंग (वय 29), इंदर लामी यादव (वय 31), रोहन (वय 28) आणि रामकृष्ण सोनी (वय 43) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यापैकी 8 जण महाराष्ट्रातील, चौघेजण मेघालयमधील, 4 जण ओडिशा, मध्यप्रदेश, पश्चिम बंगालमधील व चौघे गुजरातमधील आहेत, अशी माहिती बेंगळूर शहर पोलीस आयुक्त सीमंतकुमार सिंग यांनी पत्रकार परिषदेत दिली. आरोपींकडून 41 कॉम्प्युटर, 82 पॉवर केबल्स, 21 लॅन केबल्स, 2 हजेरी रजिस्टर, 4 स्क्रिप्ट नोटबूक, 25 मोबाईल व बनावट ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत. पुढील तपास सुरू आहे.

Advertisement

एचएसआर लेआऊटमध्ये बनावट बीपीओ कंपनी उघडून नागरिकांना फोन करून फसवणूक केली जात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हरिशकुमार यांनी सुमोटो दाखल करून 16 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींनी दोन वर्षांपूर्वी सीबिट्स सोल्युशन प्रा. लि. नावाने बीपीओ कंपनी उघडली होती. इमारतीच्या दोन मजल्यांमध्ये 20 ते 25 जण काम करत होते. ऑनलाईन काम असल्याने सांगून कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली. जनतेची फसवणूक कशी करायची याचे प्रशिक्षणही देण्यात आले. त्यानंतर युएसएसह विविध देशातील नागरिकांना रात्रीच्यावेळी फोन करून पोलीस अधिकारी, विविध तपास एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवून गुन्हे प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका ठेवला जात होता. नंतर मदत करण्याचे सांगून फसवणूक केली जात होती. ऑनलाईनवरून अज्ञात लोकांची माहिती जमा करून त्यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधला जात होता. त्यांना अमली पदार्थ नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हे दाखल झाल्याचे सांगून धमकावले सांगून मदतीच्या आमिषाने लाखो रुपये उकळले जात होते.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article