For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur Crime | कोल्हापुरात तरुणावर टोळक्याचा हल्ला ;शाहुपुरी पोलिसांत गुन्हा नोंद

01:32 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur crime   कोल्हापुरात तरुणावर टोळक्याचा हल्ला  शाहुपुरी पोलिसांत गुन्हा नोंद
Advertisement

                         ताराबाई पार्क परिसरात मारहाण

Advertisement

कोल्हापुर - आमच्या माणसांसोबत वाद का घातलास ,असा जाब विचारत 10 ते 12 जणांच्या टोळक्यांनी तरुणास जबर मारहाण केली. यामध्ये यश चव्हाण हा गंभीर जखमी झाला आहे. शुक्रुवारी सांयकाळच्या सुमारास ताराबाई पार्क येथील महाविद्यालय परिसरात हा प्रकार घडला. या प्रकरणी यशने दिलेल्या फिर्यादीनुसार, अथर्व कोले ,ओम सोनटक्के या दोघांसह 10 जणांवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी दु.3 च्या सुमारास यश चव्हाण व त्याचे मित्र साद शेख,सक्षम ढोंबरे, दर्शन चव्हाण हे मेरी वेदर मैदानावर फुटबॉल खेळत होते.

या ठिकाणी अनोळखी तरुण आला. त्यांनी या चौघांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.यश व त्या तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद यशच्या मित्रांनी मिटवला होता. फुटबॉल खेळुन यश मोपेडवरुन आरटीओ कार्यालयाकडे निघाले असता मित्राबरोबर थांबला असता त्यांचावर अथर्व कोले ,ओम सोनटक्के यांनी त्याला मारहाण केली. मारहाण करण्याऱ्या आरोपींवर शाहुपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली असुन पुढील तपाल सुरु आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.