Ganeshotsav 2025: परतीच्या प्रवासासाठी चिपळून आगारातून 274 बसेस, सेवेसाठी स्वतंत्र कक्ष
२३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत त्याचा हा प्रवास सुरु झाला होता
चिपळूण : लाडक्या बाप्पाच्या विसर्जनानंतर गावच्या दिशेने दाखल झालेले चाकरमानी पुन्हा कर्मभूमीकडे निधणार आहेत. त्यांच्या या परतीच्या प्रवासासाठी चिपळूण आगारातून तब्बल २७४ जादा एसटी बसेस रवाना होणार आहेत. २ ते ६ सप्टेंबरपर्यंत हा परतीचा प्रवास सुरु राहणार असून प्रवाशांच्या सेवेसाठी आगार प्रशासन सज्ज झाले आहे. शिवाय प्रवाशांची प्रवासादरम्यान गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र वाहतूक कक्षाचीही उभारणी केली जाणार आहे.
गणेशोत्सव व चाकरमानी हे अनोखे नाते असल्याने या सणानिमित्त मुंबई, पुण्याठिकाणी असलेला बहुसंख्य चाकरमानी गेल्या सोमवारी कोकणात दाखल झाले आहेत. २३ ते २७ ऑगस्ट या कालावधीत त्याचा हा प्रवास सुरु झाला होता. बहुतांशी चाकरमानी दाखल झाल्यानंतर पर नियोजित गावच्या दिशेकडे निघाल्याने यावेळी प्रवासादरम्यान मध्यवर्ती बसस्थानकात झालेली गर्दी लक्षात घेता चिपळूण आगाराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
२७ रोजी जल्लोषात लाडक्या बाप्पाचे आगमन झाल्यानंतर पूजा, आरत्या, भजन तर पारंपरिक कार्यक्रमात गणेशभक्त तल्लीन झाला आहे. मंगळवारी गणेश विसर्जनानंतर दाखल झालेला चाकरमानी पुन्हा कर्मभूमीकडे निघणार आहे. त्यांच्या परतीच्या प्रवासासाठी चिपळूण आगार सज्ज झाला असून त्यादृष्टीने सुसज्ज नियोजन करण्यात आले. यासाठी काही दिवसापूर्वीच नियोजनाची बैठकही घेण्यात आली होती.
परतीच्या प्रवासासाठी निघणाऱ्या जादा एसटी बसेस या शहरातील शिवाजीनगर बसस्थानकात पार्किंग करण्यात आल्या आहेत. यंदा परतीच्या प्रवासासाठी चाकरमान्यानी एसटी बसेसला प्राधान्य दिले असून त्यानुसार आतापर्यंत ६९ एसटी बसेस या ग्रुप बुकिंग झाल्या आहेत. खऱ्या अथनि मंगळवारपासून परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार असून त्यानुसार २ रोजी-४०, ३ रोजी-१२६, ४ रोजी-८५, ५ रोजी-१५ तर ६ रोजी-८ अशा २७४ इतक्या बसेस खाना होणार आहेत