Ganeshotsav 2025 Malkapur Shahu Mandal: मलकापुरातील शाहू तरुण मंडळाच्या गणेश मंदिराला 50 वर्षांची परंपरा
संगमरवरातील गणपतीची विलोभनीय मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे
By : संतोष कुंभार
शाहूवाडी : तालुक्यातील मलकापूरात असलेले गणेश मंदिर भक्तांचे श्रद्धास्थान ठरले आहे. 50 वर्षाची परंपरा असलेल्या या गणेश मंदिरात गणेशोत्सव आणि गणेश जयंती सोहळा साजरा केला जातो. सामाजिक बांधिलकी म्हणून सामाजिक उपक्रम राबवण्याचा देखील वारसा शाहू तरुण गणेश मंडळाने कायम ठेवला आहे.
संगमरवरातील गणपतीची विलोभनीय मूर्ती भक्तांचे लक्ष वेधून घेत आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वसलेलं आणि कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या मलकापूरात पेरीड नाका येथील गणेश मंदिर पूर्वी छोट्या स्वरूपात होते. शहराच्या प्रवेशद्वारावरील या मंदिराचा विस्तार करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आणि
आज तेच मंदिर नव्या रूपात साकारले आहे. मंडळाची पूर्वापार असलेली गणेशोत्सवाची परंपरा 50 वर्षाच्या वाटचालीत कायमच राहिली आहे पूर्वीपासून ज्येष्ठ भक्तगण दिलीप धनलोभे, श्रीधर शेंडे, पांडुरंग शेंडे यांच्यासह समीर धनलोभे, नवीन फल्ले, शिवकुमार विभुते, मुन्ना तांदळे, सुशांत मोहिते, दिवंगत सचिन संसारे आदींसह मंडळातील सर्व ज्येष्ठ, युवक कार्यकर्ते, महिला भगिनींच्या पुढाकाराने येथे विविध उपक्रम होत आहेत.
शहरात प्रवेश केल्यानंतर भाविक या मंदिरात गणेशचरणी नतमस्तक होऊन जात असतात. रोज सकाळी अभिषेक, मंत्रोपचार, आरती अशा वातावरणात वर्षभर धार्मिक विधी सुरू असतात. शहराच्या वैभवात भर मलकापूर शहरातील या गणेश मंदिरात अंगारकी संकष्टी, चतुर्थी आणि प्रतिमहिना असलेल्या संकष्टी चतुर्थीला पंचक्रोशीतील असंख्य भक्तगणांचा दर्शनासाठी ओघ सुरू असतो.
त्यामुळे शहराच्या वैभवात या मंदिराच्या रूपाने भरच पडत आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीव शाहू तरुण मंडळाने पूर्वीपासून नेहमीच सामाजिक जबाबदारीची जाणीव जपली आहे. समाजातील वंचित घटक, शालेय विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून त्यांनी मदतीच्या रूपान सामाजिक बांधिलकी जपली आहे.
वेगळेपण जपण्याचा प्रयत्न मंडळाने गणेशोत्सव काळात वेगळेपण जपत पारंपरिक संस्कृती, वेशभूषेला प्राधान्य देत उत्सव साजरा करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे. समाजाभुप उपक्रम देखाव्याच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न मंडळाकडून केला जातो.
"कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील या गणेश मंदिरामध्ये अनेक भक्तगण येत असतात. पूर्वी छोट्या स्वरूपात मंदिर होते. त्याकाळचे सवंगडी एकत्र येऊन हा उत्सव साजरा करत होतो. कालांतराने त्यामध्ये बदल होत गेला, मनातील देवाविषयीची श्रद्धा त्या गणरायाचे आशीर्वाद पाठीशी सदैव राहिले. त्यातूनच भक्ती करण्याला अधिकच चालना मिळाली. रोज सकाळी काही वेळ देवासाठी आपला वेळ खर्च करून त्याच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर मिळणारे आत्मिक समाधान हे अनमोल आहे."
- दिलीप धनलोभे, गणपतीची सेवा करणारे भक्त
[embedyt] https://www.youtube.com/watch?v=tduqy2hn1jc[/embedyt]