दोन वर्षात १ लाख गणेश मुर्तीचे पर्यावरण पुरक विसर्जन! दोन हजारहून अधिक मंडळांचाही सहभाग
आशिष आडिवरेकर कोल्हापूर
कोल्हापूर शहर आणि परिसरातील नागरीकांनी आता पर्यावरण संवर्धनासाठी एक पाउल पुढे टाकल्याचे दिसत आहे. गेल्या दोन वर्षाच्या गणेशोत्सवकाळामध्ये 1 लाख 10 हजार हून अधिक घरगुती गणेश मुर्त्यांचे पर्यावरण पुरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले आहे. याचसोबत गणेश तरुण मंडळांनीही यापाठोपाठ पाउल उचलले आहे. दोन वर्षात जवळपास 2500 हून अधिक मोठ्या गणेश मुर्त्यांचे पर्यावरण पुरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले आहे. प्रशासनाच्या जलस्त्राsत प्रदुषण बचाव मोहिमेला यामुळे बळ मिळत आहे.
पारंपारीक पणे गणेशमुर्ती नद्यांमध्ये विसर्जीत करण्याची परंपरा रुढ होती. पुर्वी बहुतांशी मुर्ती या शाडूच्या होत्या. मात्र यामध्ये बदल घडून मुर्तींचे स्वरुप बदलले. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती बनविण्याकडे कल वाढला. प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या मुर्ती पाण्यामध्ये लवकर विरघळत नाही. याचसोबत या मुर्तीवर असणारा रंग हा प्रदुषणकारी असल्याने नैसर्गिक जलस्त्राsतांच्या प्रदुषणामध्ये भर पडते. याविरोधात पर्यावरणवादी संघटना, सामाजिक संघटनांनी न्यायालयामध्ये जनहित याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाने जलस्त्राsतांचे प्रदुषण रोखण्यासाठी प्रदुषण नियंत्रण मंडळास अटी व शर्थी लागू केल्या. यानुसार प्रदुषण नियंत्रण मंडळाने महापालिकेस सुचना केल्या. महापालिका, पर्यावरणवादी संघटना, सामाजिक संघटना यांनी मुर्तीदानाचे आवाहन केले. या आवाहनास प्रतिसाद देत कोल्हापूरकारांनी गेल्या दोन वर्षात 1 लाख गणेश मुर्तींचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन केले.
उचगांव, उजळाईवाडी, मोरेवाडी येथील मुर्तीही महापालिकेकडे
कोल्हापूर महापालिकेकडील आकडेवारीनुसार शहराच्या आसपास असणाऱ्या उपनगरातूनही मोठ्या प्रमाणात मुर्ती महापालिकेकडे येत आहेत. पाचगांव, कळंबा, उंचगाव, आर. के. नगर, मोरेवाडी, उजळाईवाडी, पिरवाडी, या गावातूनही गणेश मुर्ती विसर्जनासाठी महापालिकेकडे गोळा होत आहेत. शहराच्या आसपास असणाऱ्या अनेक गावे आता विसर्जनासाठी महापालिकेकडे येत आहेत.
सर्व मुर्ती खणीत विसर्जन
महापालिकेच्या वतीने शहरात 220 ठिकाणी कृत्रिम कुंडाची उभारणी करण्यात येते. गांधी मैदान, छत्रपती शिवाजी महाराज मार्केट, राजारामपुरी, छत्रपती ताराराणी मार्केट या कार्यालयाच्या परिसरात कृत्रिम विसर्जन कुंडाची उभारणी महापालिकेच्या वतीने करण्यात येते. या ठिकाणी विधीवत विसर्जन करण्यात येते. यानंतर कृत्रिम कुंडातून या गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी महापालिकेच्या वतीने ट्रॅक्टर, टेम्पोमधून इराणी खणीकडे नेल्या जातात
सार्वजनिक मंडळांचा वाढता सहभाग
घरगुती गणेश मुर्तीं पाठोपाठ सार्वजनिक गणेश मंडळांच्या मोठ्या गणेश मुर्तीही विसर्जनासाठी आता इराणीखणीकडे येत आहेत. बहुतांशी मंडळे पंचगंगा नदी, कोटीतीर्थ तलाव, राजाराम तलाव, शिंगणापूर बंधारा या ठिकाणी विसर्जीत न करता त्या महापालिकेकडे देत आहेत. गेल्या दोन वर्षात 2 हजार 500 हून अधिक गणेश मुर्ती महापालिकेकडे विसर्जनासाठी देण्यात आल्या आहेत.
निर्माल्य दानाला वाढता सहभाग
गणेश मुर्तीसोबतच निर्माल्य दान करण्यासाठीही नागरीकांचा मोठा कल दिसत आहे. नागरीकांनी जलस्त्राsतामध्ये विसर्जीत न करता दान केलेले 155 टन निर्माल्या 2022 मध्ये तर, 2023 मध्ये 190 टन निर्माल्य महापालिकेच्या वतीने गोळा करण्यात आले होते. यावरुन आता नागरीक निर्माल्यही वाहत्या पाण्यात न सोडता दान करत असल्याचे दिसून येत आहे.
शहर व जिह्यातील आकडेवारी
जिह्यात घरगुती गणेश मुर्ती सार्वजनिक मंडळ
2022 2 लाख 71 हजार 2 हजार 590
2023 2 लाख 79 हजार 2 हजार 810
शहरातील घरगुती गणेश मुर्ती सार्वजनिक मंडळ
2022 51 हजार 500 1 हजार
2023 55 हजार 350 1 हजार 198
गेल्या दोन वर्षामध्ये नागरीकांनी पर्यावरण पुरक गणेश उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावर्षीही महापालिकेच्या वतीने कृत्रिम विसर्जन कुंड उभारण्यात आले आहेत. नदीचेच पाणी या कुंडामध्ये विसर्जनासाठी वापरत आहे. यामुळे नागरिकांनी जलस्त्राsतांचे संवर्धन करण्यासाठी गणेश मुर्तीचे कृत्रिम कुंडामध्ये विसर्जन करुन पर्यावरण पुरक गणेशोत्सवस साजरा करावा.
अतिरिक्त आयुक्त राहूल रोकडे