For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश मूर्तिकारांच्या समस्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार : संजू परब; माजगावच्या गणेश मूर्तिकार विलास मांजरेकर यांचा सत्कार

गणेश मूर्तिकारांच्या समस्यांसाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार   संजू परब  माजगावच्या गणेश मूर्तिकार विलास मांजरेकर यांचा सत्कार
Advertisement

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांना वाढती महागाई आणि विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून, त्यांच्या समस्या शासनाच्या माध्यमातून सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांनी सांगितले. गणेश मूर्तिकारांच्या कलेला शासनाच्या माध्यमातून योग्य व्यासपीठ मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नारायण राणे, आमदार दीपक केसरकर आणि आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध गणेश मूर्तिकार आणि माजगाव उद्योगनगर येथील मूर्तिकार विलास मांजरेकर यांना कुंभार समाजाच्या वतीने नुकताच कोकण कलारत्न’ पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच त्यांना राज्यस्तरीय कला पुरस्कारही जाहीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर संजू परब यांनी माजगाव उद्योगनगर येथील त्यांच्या गणेश मूर्ती कार्यशाळेला भेट देऊन मांजरेकर यांचा सत्कार केला.

यावेळी विलास मांजरेकर यांनी गणेश मूर्तिकारांसमोरील विविध समस्या मांडल्या. वाढत्या महागाईमुळे रंग, माती तसेच इतर साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी मूर्तिकारांना दिवस-रात्र तीन ते चार महिने मेहनत घ्यावी लागते. मात्र, एवढी मेहनत करूनही शासनदरबारी मूर्तिकारांना अपेक्षित सन्मान आणि सुविधा मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. मूर्तिकारांच्या समस्या शासनाने गांभीर्याने घेऊन त्या सोडवाव्यात, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Advertisement

यावेळी संजू परब म्हणाले की, “कुंभार समाजाच्या माध्यमातून विलास मांजरेकर यांचा आदर्श गणेश मूर्तिकार म्हणून झालेला सन्मान हा केवळ सावंतवाडी तालुक्याचे नव्हे, तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्य आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मांजरेकर गणेश मूर्तींसह विविध मूर्ती साकारण्याचे काम करत आहेत. त्यांच्या कलेला मिळालेला सन्मान हा त्यांच्या दीर्घकाळच्या सेवेला मिळालेले फळ असल्याचे त्यांनी सांगितले.

गणेश मूर्तिकलेचा व्यवसाय अनेक कुटुंबांमध्ये पिढ्यानपिढ्या आध्यात्मिक भावनेतून सुरू आहे. मात्र, वाढती महागाई, साहित्याचे वाढते दर आणि शासनाकडून अपेक्षित सुविधा व सन्मानाचा अभाव यामुळे मूर्तिकारांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या समस्या शासनाच्या माध्यमातून कशा सोडविता येतील, यासाठी आपण निश्चितपणे प्रयत्न करणार असल्याचे परब यांनी सांगितले.

दरम्यान, विलास मांजरेकर यांना राज्यस्तरीय कुंभार समाजाच्या माध्यमातून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल संजू परब यांनी त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी मांजरेकर यांचे सुपुत्र ओंकार मांजरेकर, गुरु मटकर, समीर पालव आदी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.