For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

तालुक्यात गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी

10:42 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
तालुक्यात गणेश जयंती भक्तीमय वातावरणात साजरी
Advertisement

ठिकठिकाणी महाप्रसादाचे आयोजन, भाविकांनी घेतला लाभ : देवदर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी : मंदिरांत पूजा-अर्चा, अभिषेक, आरती कार्यक्रम

Advertisement

वार्ताहर /उचगाव

माघी गणेश जयंतीला एक विशेष महत्त्व असल्याने उचगाव परिसरातील प्रत्येक गावांमधून असलेल्या गणेश मंदिरमधून स्थानिक पातळीवरील परंपरेनुसार गणेश जयंतीचा सोहळा अभिषेक, पूजा, आरती तसेच महाप्रसाद अशा विविध कार्यक्रमाने भक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.

Advertisement

उचगाव

उचगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गणेश मंदिरमध्ये पहाटेपासूनच अभिषेक, पूजा-अर्चा कार्यक्रमाला प्रारंभ झाला. सकाळपासूनच या मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्याचे चित्र व यानंतर दुपारी महाप्रसादासाठी लागलेल्या रांगांचे चित्र दिसून येत होते. याबरोबरच मध्यवर्ती गणेश मंदिरांमध्ये भाविकांनी गणेश मूर्तीचे पूजन व आरती करून दर्शन घेतले. तसेच बेळगाव-वेंगुर्ले मार्गावरील मार्कंडेय तीर्थक्षेत्रावर असलेल्या मार्कंडेय गणेश मंदिरमध्ये परिसरातील उचगाव, सुळगा, कल्लेहोळ, तुरमुरी, बाची, बसुर्ते येथील नागरिकांनी मंदिरात येऊन दर्शन घेतले. सदर मंदिर हे या महामार्गावर असल्याने येथून ये-जा करणाऱ्या भाविकांनी आपली वाहने थांबवून दर्शन व तीर्थप्रसाद घेऊनच पुढे जातानाचे चित्र दिसून येत होते.

तुरमुरी

तुरमुरी येथे गणेशजयंतीचा उत्सव मोठ्या धुमधडाक्मयामध्ये साजरा करण्यात आला. गणपत गल्लीतील गणेश मंदिरमध्ये पहाटेच विधीपूर्वक भाविकांच्या उपस्थितीत गणेश जयंती साजरी करण्यात आली. यावेळी जन्मसोहळा मोठ्या थाटात पार पडला. तर तुरमुरी गावच्या कॉलनीमध्ये असलेल्या गणेश मंदिरमध्ये गणेश जयंती साजरी करण्यात आली. या ठिकाणी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी तुरमुरी तसेच कोनेवाडी अशा जवळपासच्या भक्तांनी या मंदिरात येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

सुळगा -हिंडलगा

येथील गणपत गल्लीतील गणेश मंदिरामध्ये प्रतिवषी गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडतो. सकाळी सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत अभिषेक, महापूजा आणि महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व ग्रामस्थ, महिला, भाविक उपस्थित होते. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व भाविकांनी या मंदिरात येऊन महाप्रसादाचा लाभ घेतला.

सावगाव

सावगावच्या प्रवेशद्वारानजीक असलेल्या गणेश मंदिरामध्ये गावातील ग्रामस्थांनी सकाळपासूनच या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. सकाळी पूजा, अर्चा, अभिषेक, महाआरती व नंतर तीर्थप्रसाद असे आयोजन करण्यात आले होते. यानंतर दुपारी गावातील भाविकांसाठी तीर्थप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गावातील भाविकांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला.

बेकिनकेरे

बेकिनकेरे येथील गणपत गल्लीतील गणेश युवक मंडळाच्यावतीने गणेश जयंती उत्साहात पार पडली. यावेळी गणेश मंदिरामध्ये गावातील भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक, पूजा-अर्चा, आरती व तीर्थप्रसादाचा कार्यक्रम झाला. गावातील नागरिकांनी दिवसभर मंदिरात येऊन बाप्पांचे दर्शन घेतले.

कंग्राळी बुद्रुक येथे गणेश जयंती साजरी

येथील कलमेश्वर गल्लीतील श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये श्री कलमेश्वर युवक मंडळ, श्री कलमेश्वर मंदिर सोसायटी समिती व ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी गणेश जयंती, मंदिर वर्धापन दिन, विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे वाटप असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. मंगळवारी सकाळी श्री गणेश पूजन, गणहोम, अभिषेक आदी धार्मिक कार्यक्रम पार पडला. यावेळी सुवासिनींनी पाळणागीत गायीले.

चार हजार भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

गणेश जयंती व मंदिर वर्धापन दिनानिमित्त आयोजिलेल्या महाप्रसादाचा जवळजवळ चार हजार भाविकांनी लाभ घेतला. दुपारी 1 पासून महाप्रसादाला वाटप करण्यात आले. यावेळी गौंडवाड, यमनापूर, शाहूनगर परिसरातील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

शास्त्रीनगर सिद्धीविनायक मंदिरमध्ये महाप्रसादाचे वाटप

कंग्राळी बुद्रुक येथील शास्त्राrनगरमधील श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये मंगळवारी गणेश जयंती मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात आली. सकाळी विधिपूर्वक पूजन, अभिषेक व गणहोम कार्यक्रमही झाले. यावेळी सुवासिनींनी पाळणा म्हणून आनंद व्यक्त करण्यात आला. रात्री 8 नंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आले. यावेळी चार हजारहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी के. आय. सत्तीगेरी, एम. आर. पाटील, बंडू कुगे, मारुती बिसिरती, चंद्रशेखर वक्कुंद, माजी महापौर बी. एस. चिक्कलदिनी, विरेंद्र मुडलगी, शिवानंद मुडलगी, मनोहर कडोलकर व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Advertisement
Tags :

.