For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शहर परिसरात गणेश जयंती उत्साहात

11:10 AM Feb 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
शहर परिसरात गणेश जयंती उत्साहात
Advertisement

धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

Advertisement

बेळगाव : शहर परिसरात मंगळवारी गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गणेश मंदिरांतून सकाळपासून विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.  काकडारती, गणहोम, अभिषेक, तीर्थप्रसाद, महाप्रसाद वाटप करण्यात आले. सकाळपासूनच गणेश मंदिरांतून गणेश दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. त्यामुळे गणेश मंदिरे भाविकांनी फुलून गेली होती.

चन्नम्मा सर्कल गणेश मंदिर

Advertisement

चन्नम्मा सर्कल येथील गणेश मंदिरमध्ये सकाळी 8 वाजता महापूजा, सायंकाळी 5 वाजता, जाणकार मंडळाचा भजनाचा कार्यक्रम पार पडला. सायंकाळी 6 वाजता गणेशाचा पाळणा  झाला. सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

स्वयंभू गणेश मंदिर, अनगोळ नाका, टिळकवाडी

श्री स्वयंभू गणेश मंदिरतर्फे गणेश जयंती मोठ्या उत्साहात पार पडली. पहाटे काकडारती, अभिषेक व त्यानंतर सकाळी 9 वाजता श्री होम करण्यात आला. दुपारी 12 वाजता श्री गणेश जन्मोत्सव व महाआरती करण्यात आली. बुधवार दि. 14 रोजी 12 ते 3 या वेळेत महाप्रसादाचे वितरण होणार आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन दामोदर भोसले यांनी केले आहे.

राणी चन्नम्मानगर पहिला क्रॉस

येथील गणेश मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. गणहोम, महाआरती, तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले. सायंकाळी महिला भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. यानंतर महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम पार पडला. रात्री आरतीनंतर तीर्थप्रसादाचे वाटप करण्यात आले.

हिंदूनगर-टिळकवाडी

हिंदूनगर, टिळकवाडी येथील महागणेश मंदिरात गणेश जयंती व मंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. सकाळी गणहोम, नवग्रह शांती, अभिषेक व पूजेनंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. 2 हजार भक्तांनी याचा लाभ घेतला.

सिद्धिविनायक मंदिर, भेंडीबाजार

मोतीलाल चौक, भेंडीबाजार येथील श्री गणेशोत्सव मंडळातर्फे सिद्धिविनायक मंदिरात गणेश जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने महापूजा, आरती, अभिषेक असे धार्मिक कार्यक्रम झाले. भक्तांची दर्शनासाठी सकाळपासून वर्दळ वाढली होती.

सिद्धिविनायक मंदिर, सरस्वतीनगर, गणेशपूर

येथील गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. सकाळी 11 वाजता गणहोम झाला. त्यानंतर कलावती आईंचे भजन सादर झाले. सायंकाळी महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम झाला. गणेश जन्मोत्सव पाळणा झाल्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.

Advertisement
Tags :

.