For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश घाट सुशोभीकरण काम अद्यापही अपूर्ण

गणेश घाट सुशोभीकरण काम अद्यापही अपूर्ण
Advertisement

१५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण न झाल्यास धरणे आंदोलन ; शिवसेना कुडाळ शहरप्रमुख अभिषेक गावडे यांचा इशारा ; ठेकेदारावर कारवाईची मागणी

Advertisement

कुडाळ / वार्ताहर
कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या काठी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना (शिंदे) कुडाळ शहर प्रमुख तथा नगरसेवक अभिषेक गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या कामाला तब्बल दोन वर्षे पूर्ण होऊनही अद्याप काम अपूर्ण आहे. सुशोभीकरणाचे सदर काम १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण न झाल्यास कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा त्यांनी दिला आहे. संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.श्री गावडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामासाठी ११ ऑक्टोबर २०२४ ते ११ ऑक्टोबर २०२५ अशी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. मात्र, संबंधित ठेकेदार निर्धारित कालावधीत काम पूर्ण करू शकला नाही. त्यानंतर प्रशासनाकडून ३१ मे २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. तरीदेखील आजपर्यंत हे काम अपूर्णच असल्याचे श्री गावडे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

अन्यथा धरणे आंदोलन......

Advertisement

गणेश चतुर्थी अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपली असताना गणेश घाटाचे काम अद्याप अपूर्ण असल्यामुळे गणेशभक्त व नागरिकांमध्ये नाराजी वाढत आहे. तसेच नागरिकांमध्ये संतापाची भावनाही निर्माण झाली आहे.संबंधित ठेकेदाराच्या चालढकल भूमिकेमुळे हे काम रखडल्याचा आरोप श्री गावडे यांनी करून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.तसेच गणेश घाट सुशोभीकरणाचे काम १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण न झाल्यास कुडाळ नगरपंचायत कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्री. गावडे यांनी दिला आहे.

Advertisement
Tags :

.