For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गणेश कंझ्युमरचा आयपीओ बाजारात

06:06 AM Sep 24, 2025 IST | Tarun Bharat Portal
गणेश कंझ्युमरचा आयपीओ बाजारात
Advertisement

24 सप्टेंबरपर्यंत खुला : पहिल्या दिवशी 12 टक्क्यांवर सबस्क्राइब

Advertisement

मुंबई :

1936 मध्ये कोलकात्याच्या बुर्रा बाजारातील एका छोट्या किरकोळ दुकानातून सुरू झालेली कंपनी गणेश कंझ्युमर प्रोडक्ट्स यांनी आपला आयपीओ आणला आहे. 22 सप्टेंबर रोजी आयपीओच्या पहिल्या दिवशी 12 टक्क्यांवर सबक्राइब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदार 24 सप्टेंबरपर्यंत या इश्यूसाठी बोली लावू शकतात.

Advertisement

गणेश कंझ्युमर प्रोडक्ट्सने आयपीओची किंमत 306 ते 322 अशी निश्चित केली आहे. किरकोळ गुंतवणूकदार किमान एका लॉटसाठी म्हणजेच 46 शेअर्ससाठी बोली लावू शकतात. यासाठी 14,812 रुपये गुंतवावे लागतील. तुम्ही जास्तीत जास्त 13 लॉटसाठी अर्ज करू शकता.

सुरुवातीला, ही कंपनी गणेश ब्रँड अंतर्गत पीठ विकत होती. 9 मार्च 2000 रोजी कोलकातामध्ये एका जुन्या गिरणीच्या अधिग्रहणाने कंपनीची अधिकृतपणे स्थापना झाली. कंपनीचे एमडी मनीष मिमानी म्हणतात की आम्ही हरभरा उत्पादनांमध्ये आणि हरभरा सत्तूमध्ये बंगालमध्ये पहिल्या क्रमांकावर आहोत.

कंपनीचा प्रमुख ब्रँड ‘गणेश’ विविध उत्पादनांची मालिका ऑफर करतो, ज्यामध्ये बेकरी मैदा, तंदूरी आटा, रुमाली आटा, मल्टीग्रेन सत्तू, गोड सत्तू, मसाले (हळद पावडर, मिरची पावडर, धणे) आणि भुजिया आणि चना चुर सारखे पारंपारिक स्नॅक्स समाविष्ट आहेत. गेल्या तीन वर्षांत त्यांनी 11 नवीन उत्पादने आणि 94 एसकेयू लाँच केले आहेत.

Advertisement
Tags :

.