For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गनेमत, शिराझ यांचे आव्हान अद्याप जिवंत

06:03 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
गनेमत  शिराझ यांचे आव्हान अद्याप जिवंत
Advertisement

वृत्तसंस्था/ लोनाटो डेल गेर्दा (इटली)

Advertisement

आयएसएसएफच्या येथे सुरु असलेल्या विश्वचषक शॉटगन नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या स्किट नेमबाजी प्रकारात भारताच्या गनेमत सेखॉचे तसेच पुरुष विभागात शिराझ शेख आणि अनंतजीत सिंग नारुका यांचे पदकासाठीचे आव्हान अद्याप जिवंत राहिले आहे.

या क्रीडा प्रकारातील पाच पैकी चार फेऱ्या झाल्या आहेत. महिलांच्या विभागात गनेमत शेखॉने एकूण 95 शॉट्स नोंदवित नववे स्थान मिळविले आहे. अमेरिकेची व्हिजी आणि स्विडनची लार्सन या अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर आहेत. या दोघींनी समान 97 शॉट्स नोंदविले आहेत.

Advertisement

पुरुषांच्या स्किट नेमबाजी प्रकारात शिराझ शेख आणि अनंतजीत नारुका यांनी चार फेऱ्या अखेर प्रत्येकी समान 97 शॉट्स नोंदविले असून ते अनुक्रमे 19 व्या आणि 21 व्या स्थानावर आहेत.

Advertisement
Tags :

.