गणेबैल कब्बडी संघाला दुहेरी मुकुट
खानापूर : येळळूर येथील गुरुवर्य वाय. एन. मजूकर फाऊंडेशनच्यावतीने श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचालित गणेबैल हायस्कूल मैदानावर शिक्षण मंडळाच्या अंतर्गत घेण्यात येणाऱ्या शाखा हायस्कूलमधील मुला-मुलींच्या कबड्डी स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाय. एन. मजूकर होते. कार्यक्रमाची सुरुवात गणेबैल हायस्कुलच्या विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागतगीताने झाली. मुख्याध्यापक आर. बी. पाटील यांनी प्रास्ताविक करुन उपस्थितांचे स्वागत केले. फोटोपूजन बबन डेळेकर, सदानंद मोरे, मुख्या. एम. डी. धामणेकर, आय. बी. राऊत, आप्पाणा कुट्रे, माजी सैनिक सुनील काजुणेकर यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन व दीपप्रज्वलन संस्थापक अध्यक्ष वाय. एन. मजूकर, प्रसाद मजूकर, संचालक नरेंद्र मजूकर, प्रकाश कुडतूरकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना वाय. एन. मजूकर म्हणाले की, या फाऊंडेशनच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या कबड्डी स्पर्धेत श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळातील गणेबैल हायस्कूल, चांगळेश्वरी हायस्कूल येळळूर, श्री ज्ञानेश्वर विद्यालय लोकोळी, श्री रवळनाथ हायस्कूल शिवठाण, मणतुर्गा हायस्कूल, कारलगा हायस्कूल या शाळांचा समावेश होता. गणेबैल हायस्कूलच्या मुला आणि मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक मिळविला तर लोकोळी स्कूलच्या मुलींच्या संघाला आणि मणतुर्गा स्कूलच्या मुलांच्या संघाला द्वितीय क्रमांकावर समाधान मानले. व्यासपीठावर मुख्या. एस. एम. येळळूरकर, आर. बी. पाटील, ए. एम. पाटील, पी. ए. पाटील, जे. एम. पाटील, ए. डी. धामणेकर, आय. बी. राऊत उपस्थित होते. या स्पर्धेत पंच म्हणून अविनाश पाटील, उमेश धबाले, के. आर. पाटील, पी. टी. चोपडे, ए. डी. घाडी, एम. एम. डोंबळे, जी. आर. मेरवा यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.