For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर गांधीनगर रहिवाशांची मनपाकडे धाव

10:53 AM May 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
कुत्र्यांच्या हल्ल्यानंतर गांधीनगर रहिवाशांची मनपाकडे धाव
Advertisement

कुत्र्यांचा बंदोबस्त करा : अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा

Advertisement

बेळगाव : गांधीनगर येथे कुत्र्याच्या हल्ल्यात दोन लहान मुले गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. कुत्र्यांचा महानगरपालिकेने बंदोबस्त करावा, या मागणीसाठी सोमवारी गांधीनगर येथील नागरिकांनी महानगरपालिकेवर मोर्चा काढून त्याचा निषेध नोंदविला. कुत्र्यांचा बंदोबस्त केला नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला आहे. गांधीनगर येथील निजामुद्दीन गल्ली, दुसरा क्रॉस येथील कैफ पाच्छापुरे व ऐझल पठाण या लहान मुलांवर कुत्र्याने हल्ला केला होता. यामध्ये एका मुलाच्या गालाचा चावा घेतला. याचबरोबर त्याच्याच डोक्यावर हल्ला करून त्याला गंभीर जखमी केले. त्याच्यावर सध्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र त्याची अवस्था गंभीर असून, महानगरपालिकेने त्या मुलाच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मनपा आयुक्त-आरोग्याधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे

Advertisement

दुसऱ्या मुलालावरही उपचार करण्यात आले असून, त्याच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. असे असले तरी त्याच्या कुटुंबीयांचीही परिस्थिती गंभीर असून त्या कुटुंबालाही मदत करावी, अशी मागणी करण्यात आली. नगरसेवकांबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. मते मागण्यासाठी हे नगरसेवक येतात. मात्र अशा घटना घडल्यानंतर ते फिरकत नाहीत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. गांधीनगर तसेच इतर परिसरात वारंवार कुत्री हल्ला करत आहेत. तेव्हा त्यांचा बंदोबस्त करणे महत्त्वाचे आहे. मनपा आयुक्त तसेच आरोग्याधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. यावेळी अफजल पठाण, सेहबाज पठाण, मकसुद मकानदार, जाखीर पाच्छापुरे, उल्फत रंगरेज, अल्माज गोकाक, फिरदोस शेख यांच्यासह नागरिक व महिला उपस्थित होत्या.

Advertisement
Tags :

.