For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ganpatipule Trip Accident | गणपतीपुळ्याला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला; भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू

11:44 AM Jun 14, 2026 IST | NEETA POTDAR
ganpatipule trip accident   गणपतीपुळ्याला निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला  भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू
Advertisement

Advertisement

उंब्रज - गणपतपुळे येथे फिरायला निघालेल्या युवकांच्या कारला मायनी मल्हारपेठ राज्य मार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडल्याची घटना घडली असून यामध्ये २३ वर्षीय युवक जागीच ठार झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. तिघेजन सुट्टी असल्याने गणततपुळे येथे फिरण्यासाठी शेवोरलेट क्रुझ कारने निघाले होते. रविवारी पहाटे पावने एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

मायनी मल्हारपेठ राज्य मार्गावर वडोली भिकेश्वर ता. कराड गावचे हद्दीत वळणावर भरधाव वेगाने जाणारी कार मातीच्या ढिगाऱ्याला धडकून तीन ते चार कोलांट्या घेत रस्त्यालगतच्या शिवारात पलटी झाली. भीषण अपघातात एक जण ठार झाला असून अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले. सुनील ओंकार खंडागळे वय २३ राहणार पाटण मूळ राहणार बीड असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

Advertisement

तरी या अपघातात प्रतिक रमेश धावणे वय २८ राहणार चंद्रपूर हा युवक गंभीर जखमी झाला आहे तसेच हरीश सुरेश वाघमारे व २८ राहणार पडळ हा युवक किरकोळ जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळतात मसूर पोलीस ठाण्याचे सुधाकर भोसले, कोळेकर तसेच पोलीस पाटील राजू रामुगडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले व जखमींना उपचारासाठी कराड येथे दाखल केले आहे.

Advertisement
Tags :

.