महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

विमल फौंडेशनतर्फे गणहोम, अथर्वशीर्ष-महाप्रसाद वितरण

06:12 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव :

Advertisement

न्यू गुड्सशेड रोड, शास्त्राrनगर येथील विमल कॉम्लेक्स-विमल प्राईड संकुल सभागृहात सालाबादप्रमाणे यावर्षीही गणहोम, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisement

विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडला.

सकाळी विधीवत गणहोम झाला. विनायक कुलकर्णी भटजी यासह पाच भटजींनी  कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. विशेष म्हणजे यजमान म्हणून सिंधी, मारवाडी, गुजराती, जैन, मराठा, पंजाबी, लिंगायत यासह विविध धर्मातील नऊ जोडपी गणहोम पूजेला बसली होती.

गणहोमनंतर 21 वेळा अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महाप्रसाद वितरण झाले. भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.

गेल्या 15 वर्षांपासून विमल फौंडेशनच्यावतीने गणहोम, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे किरण जाधव यांनी सांगितले. फौंडेशनच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी महेश शर्मा, संदीप जाधव, मंगलानी, श्रीकांत देसाई, अनिल जैन यासह उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article