For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! वूडबॉल

06:00 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   वूडबॉल
Advertisement

वूडबॉल...हा क्रीडाप्रकार अनेकांनी कधी ऐकलेलाही नसेल. हा लाकडी दांडा आणि लाकडी चेंडूसह खेळला जाणारा एक खेळ. या प्रकारात आणि गोल्फमध्ये बरंच साम्य दिसून येतं...या खेळातील उद्दिष्ट अगदी सोपं आणि ते म्हणजे लाकडी चेंडू मोकळ्या जागेतून फटकावणं...1990 साली तैवानमध्ये वूडबॉल विकसित करण्यात आला...

Advertisement

  • वूडबॉल खेळण्यासाठी कोणत्याही विशिष्ट प्रकारच्या पृष्ठभागाची आवश्यकता नसते आणि घरामध्ये किंवा घराबाहेर, गवत, वाळू किंवा डांबरी पृष्ठभागावर देखील तो खेळला जाऊ शकतो...12 ‘फेअरवे’च्या वूडबॉल मैदानासाठी किमान 500 मीटर आणि त्याहून जास्त जागा आवश्यक असते...
  • यात वापरला जाणारा चेंडू 9.5 सेंटीमीटर व्यासाचा आणि 350 ग्रॅम वजनाचा असतो. वापरले जाणारे ‘मॅलेट’ म्हणजे दांडा बाटलीच्या आकाराच्या मुखासह सुमारे 90 सेंटीमीटर लांब असतो...
  • ‘गेट’मध्ये तीन बाटलीच्या आकाराचे ब्लॉक्स असतात. यातील दोन्ही टोकांना असलेले ‘ब्लॉक्स’ मध्यभागी असलेल्या ‘ब्लॉक’पेक्षा थोडे लांब असतात. चेंडू या दोन्हींमधून फटकावायचा असतो आणि तो लागून आखूड ब्लॉक उलटापालटा व्हायला हवा. याचा अर्थ एक ‘फेअरवे’ स्पर्धा पूर्ण झाली...
  • हा खेळ एकेरी, दुहेरी स्वरुपात किंवा 4-6 खेळाडूंच्या संघांमध्ये खेळला जाऊ शकतो...
  • या खेळात दोन प्रकारच्या स्पर्धा घेतल्या जातात. त्यापैकी एक ‘स्ट्रोक स्पर्धा’, ज्यात विजेता ठरविण्यासाठी एकूण ‘स्ट्रोक्स’ची संख्या विचारात घेतली जाते. दुसरी ‘फेअरवे स्पर्धा’. यात जिंकलेल्या ‘फेअरवे’ची एकूण संख्या विजेता ठरवण्यासाठी वापरली जाते...
  • एक सामना 12 ‘फेअरवे’चा असतो किंवा त्याच्या पटीत खेळला जातो. जो खेळाडू किंवा संघ सर्वांत कमी स्ट्रोक्ससह ‘फेअरवे’ची एकूण संख्या पूर्ण करतो किंवा सर्वांत जास्त ‘फेअरवे’ जिंकतो तो सामन्याचा विजेता ठरतो...
  • ‘वूडबॉल’ मैदानाच्या आकारानुसार वेगवेगळ्या अंतराचे ‘फेअरवे’ ठरविले जातात. सहसा ‘फेअरवे’चं अंतर 20 ते 100 मीटर राहतं...
  • 35 मीटरपेक्षा लहान ‘फेअरवे’ला ‘लहान अंतर’, 36 ते 65 मीटर दरम्यान ‘मध्यम अंतर’ आणि 66 ते 100 मीटरच्या ‘फेअरवे’ला ‘लांब अंतर’ म्हणतात. 12 ‘फेअरवे’पैकी किमान चार वक्र मार्गाचे, किमान दोन लांब अंतराचे आणि दोन कमी अंतराचे असतात...
  • तैवानमध्ये वेंग मिंग-हुई आणि कुआंग-चू यंग यांनी 1990 मध्ये या खेळाचा शोध लावला. हा खेळ ‘आशियाई बीच गेम्स’च्या कार्यक्रमात आहे आणि 2008 मध्ये त्याचा समावेश करण्यात आला...
  • ‘आंतरराष्ट्रीय वूडबॉल महासंघ’ तैपेई, तैवान येथे आहे...ती खेळाची सर्वोच्च प्रशासकीय संस्था असून त्याच्याशी निगडीत आहेत 44 देश. हा महासंघ वर्षभर अनेक आंतरराष्ट्रीय वूडबॉल स्पर्धांचं आयोजन करतो...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.