For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! : ‘ट्रॅम्पोलिन’

06:00 AM Jul 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   ‘ट्रॅम्पोलिन’
Advertisement

जिम्नॅस्टिक्स हा उन्हाळी ऑलिंपिकचा एक मुख्य भाग...हा खेळ सुरुवातीच्या स्पर्धेत सादर करण्यात आला होता आणि तेव्हापासून प्रत्येक ऑलिम्पिकमध्ये तो खेळला जातोय. पण याच खेळाच्या एका प्रकाराशी तसा लांबलचक इतिहास जोडला गेलेला नाही...‘आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स’ 1896 मध्ये ऑलिम्पिकमध्ये झळकले, तर ‘ऱ्हदेमिक जिम्नॅस्टिक्स3ब्ची त्यात 1984 मध्ये भर पडली. मात्र हा प्रकार बराच नंतर दाखल झाला अन् यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्येही त्याचं दर्शन घडेल...‘ट्रॅम्पोलिन’...

Advertisement

 • ‘ट्रॅम्पोलिनिंग’चा शोध 1934 मध्ये अमेरिकन जिम्नॅस्ट जॉर्ज निसेन यांनी लावला...‘ट्रॅपिज अॅक्रोबॅट्स’ना सुरक्षा जाळ्यांवर उडी मारत कसरती करताना पाहिल्यानंतर त्यांना ही कल्पना सूचली...
 • निसेन यांनी त्यांचे अॅक्रोबॅटिक्स साकारण्याकरिता सर्वप्रथम ‘ट्रॅम्पोलिन’ तयार केलं. सुऊवातीला अंतराळवीरांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि इतर अॅक्रोबॅटिक खेळांतील क्रीडापटूंना प्रशिक्षण देण्यासाठी जो उपकरणाचा तुकडा वापरला जायचा त्यावरील हा खेळ त्वरित लोकप्रिय झाला...
 • 1964 साली लंडनमध्ये प्रथम ‘ट्रॅम्पोलिन वर्ल्ड चॅम्पियनशिप’ आयोजित करण्यात आली होती आणि 34 वर्षांनंतर 1998 मध्ये हा खेळ आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघामध्ये दाखल झाला...
 • ‘ट्रॅम्पोलिन’च्या दोन वैयक्तिक स्पर्धांमध्ये (पुऊष आणि महिला) ट्विस्ट, बाऊन्स आणि सॉमरसॉल्ट्सची मालिका सादर करण्यात येतं. ‘ट्रॅम्पोलिन’वर खेळाडू हवेत 8 मीटरांपेक्षा जास्त उंच उसळतात....
 • ‘ट्रॅम्पोलिन’ हा सिंथेटिक फॅब्रिकपासून बनविलेला आयताकृती कॅनव्हास...‘ट्रॅम्पोलिन बेड’ ही स्टीलच्या स्प्रिंग्ससह फ्रेमला जोडलेली असते. त्यामुळे त्याची ‘रीकॉइल कृती’ खेळडूंना हवेत उंच उडवते...
 • स्पर्धेदरम्यान खेळाडू दहा घटकांचा समावेश असलेले ‘रुटिन्स’ पार पाडतात. ते किती कठीण पद्धतीनं करतात, त्यांची अंमलबजावणी कशी होते आणि हवेत घालवलेला वेळ यांचा विचार करून गुण दिले जातात. हा खेळ अत्यंत तांत्रिक आहे आणि त्यामुळे अचूकता आवश्यक असते...ऑलिम्पिकमधील ‘ट्रॅम्पोलिन’ स्पर्धांसाठी नऊ पंच नियुक्त केले जातात...
 • 2000 च्या सिडनी इथं झालेल्या ऑलिम्पिकमध्ये पुऊष आणि महिलांच्या स्पर्धांसह ‘ट्रॅम्पोलिनिंग’ प्रथमच झळकलं. तेव्हापासून स्पर्धांची संख्या बदललेली नाही...ऑलिम्पिक ट्रॅम्पोलिन स्पर्धेमध्ये पुऊष आणि महिला या दोन्ही गटांसाठी वैयक्तिक पात्रता फेरी आणि त्यानंतर वैयक्तिक अंतिम फेरी असते...
 • पात्रता फेरीत स्पर्धक दोन ‘रुटिन्स’ पार पाडतात. त्यापैकी एक अनिवार्य आणि एक ऐच्छिक असतं. या फेरीतून सर्वोच्च आठ पुऊष आणि आठ महिला खेळाडू अंतिम फेरीत पोहोचतात. अंतिम फेरीत क्रीडापटू एकच ‘रुटिन’ सादर करतात. मात्र या फेरीतील गुणांवरून पदक विजेते ठरतात...
 • ऑलिम्पिक खेळांमध्ये समावेश झाल्यापासून चीनच्या खेळाडूंनी या प्रकारातील 36 पदकांपैकी 14 पदकं जिंकलीत. त्यात चार सुवर्णपदकांचा समावेश...तथापि, ऑलिम्पिक ट्रॅम्पोलिन विजेतेपद राखण्यात यश मिळविलेली कॅनडाची रोझी मॅकलेनन ही एकमेव खेळाडू. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये प्रथम सुवर्ण जिंकल्यानंतर त्याची पुनरावृत्ती 2016 च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये घडवत तिनं हा पराक्रम नोंदवला...
Advertisement
Tags :

.