For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवीन ! : कर्लिंग

06:00 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवीन     कर्लिंग
Advertisement

कर्लिंग हा एक सांघिक खेळ. तो बर्फाच्या आयताकृती शीटवर दोन किंवा चार खेळाडूंच्या दोन संघांकडून खेळला जातो...बर्फावरून ग्रॅनाईटचा दगड सरकताना जो आवाज येतो त्यामुळं या खेळाला ‘दि रोअरिंग गेम’ही म्हटलं जातं..यात दोन संघ दगडाला एका लक्ष्याच्या दिशेनं सरकवतात...हा एक हिंवाळी ऑलिम्पिक नि पॅरालिम्पिक खेळ असून त्यात महिला, पुऊष, मिश्र दुहेरी तसंच मिश्र व्हीलचेअर संघांमध्ये पदकासाठी लढती रंगतात...

Advertisement

  • ‘कर्लिंग’मध्ये दगडाच्या मार्गातील बर्फाचा पृष्ठभाग झाडण्यासाठी ब्रशचा वापर केला जातो. यामुळं दगड आणि बर्फ यांच्यातील घर्षण कमी होते आणि दगड वळण्याचं प्रमाण कमी होऊ शकतं...
  • स्पर्धेसाठी कृत्रिमरीत्या तयार केल्या जाण्यावर बर्फाच्या पृष्ठभागावर पाण्याचे थेंब शिंपडले जातात. जे गोठून त्यांचं रुपांतर पृष्ठभागावरील लहान अडथळ्यांमध्ये होतं. याला ‘पेबल्ड बर्फ’ म्हणतात. त्यामुळं दगडाला पृष्ठभागाची पकड मिळण्यास मदत होते आणि अधिक सुटसुटीतपणे ‘कर्लिंग’ होतं...
  • ‘कर्लिंग’ शीटची लांबी 146 ते 150 फूट आणि ऊंदी 14 फूट 6 इंच ते 15 फूट 7 इंच यादरम्यान असते...दोन्ही टोकांना लक्ष्य किंवा ‘हाऊस’ असतं....
  • या खेळात वापरले जाणारे शूज सर्वसाधारण आणि बर्फाची चांगली पकड घेणारे असतात...‘कर्लिंग रॉक’ हा दुर्मिळ दाट ग्रॅनाइटचा बनलेला असतो. स्कॉटलंडच्या आयल्सा क्रेगवर उत्खनन करून तो काढला जातो. प्रत्येक दगडाचं वजन 19.96 किलोंपेक्षा जास्त आणि 17.24 किलोंपेक्षा कमी असत नाही...
  • पारंपरिक कर्लिंग संघ चार खेळाडूंचा असतो, तर खेळाच्या मिश्र दुहेरी प्रकारात एक महिला व एक पुऊष असे दोन खेळाडूंचे संघ असतात. महिला, पुऊष आणि व्हीलचेअर कर्लिंगमध्ये पाचवा बदली खेळाडू देखील असू शकतो. प्रत्येक संघ एक ‘स्किप’ म्हणजे कर्णधार आणि ‘व्हाईस-स्किप’ म्हणजे उपकर्णधार नियुक्त करतो...
  • सांघिक कर्लिंगमध्ये प्रत्येक खेळाडू टोकाकडे सलग क्रमानं दोन दगड सरकवितो. जागतिक कर्लिंग स्पर्धेत एक संघ आठ दगडांचा संच वापरतो...‘प्लेइंग पोझिशन्स’ सर्वसाधारणपणे ‘लीड’, ‘सेकंड’, ‘थर्ड’ नि ‘फोर्थ’ म्हणून ओळखल्या जातात. ‘लीड’ हा पहिले दोन दगड सरकवितो...मिश्र दुहेरीत दोन्ही संघ प्रत्येकी पाच दगड सरकवितात...
  • कर्लिंग शीटच्या प्रत्येक टोकाला वर्तुळाकार ‘हाऊस’ असतात. त्यामध्ये चार वर्तुळं राहतात. मध्यभागाला ‘बटण’ म्हणून ओळखलं जातं. सदर चार वर्तुळांमुळं कुठला ‘कर्लिंग’ दगड मध्यभागाच्या सर्वांत जवळ पोहोचलाय हे ओळखण्यास मदत होते...
  • ‘हाऊस’मध्ये पोहोचलेला किंवा त्याला स्पर्श करणारा जो दगड विरोधी संघाच्या दगडापेक्षा मध्यभागाच्या जवळ पोहोचलेला असेल तो एक गुण मिळवतो. शेवटी एकच संघ ‘स्कोअर’ करू शकतो. लढतीच्या समाप्तीच्या वेळी कोणत्याही संघाचा दगड ‘हाऊस’ला स्पर्श करत नसल्यास कोणतेही गुण मिळाले नाहीत. याला ‘ब्लँक एंड’ म्हणतात...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.