For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! ‘ब्रेकिंग’

06:00 AM Aug 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   ‘ब्रेकिंग’
Advertisement

सध्या चालू असलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समावेश झालेला एकमेव नवीन खेळ म्हणजे ‘ब्रेकिंग’...यापूर्वी ब्युनोस आयर्समध्ये 2018 साली झालेल्या युवा ऑलिंपिक खेळांत ‘ब्रेकिंग’चं दर्शन घडलं होतं...हा ‘स्केटबोर्डिंग’ आणि ‘स्पोर्ट क्लाइंबिंग’प्रमाणेच शहरी खेळ म्हणून ओळखला जातो. विविध नृत्यशैलींचा त्याच्यावर प्रभाव असला, तरी त्यात अॅथलेटिक कौशल्य व समन्वय यांची गरज असते...

Advertisement

  • ‘ब्रेकिंग’ला सामान्यत: ‘ब्रेकडान्सिंग’ म्हणून ओळखले जाते, ज्याची मुळे 70 च्या दशकातील ब्रॉन्क्स, न्यूयॉर्क येथील ‘हिप-हॉप’ संस्कृतीत दडलीत...न्यूयॉर्कच्या रस्त्यांपासून ते ऑलिम्पिक खेळांच्या भव्य मंचापर्यंत या खेळानं जो प्रवास केलाय  त्याची कल्पना अनेकांनी कधी केली नसेल...यात ‘स्पिन’, ‘फ्लिप’ अन् इतर जटील तंत्रांसह अॅथलेटिक चालींची जोड दिलेली असते...
  • 90 च्या दशकात ‘ब्रेकिंग’च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू झाल्या...‘ब्रेकिंग’ हा शब्द संगीतातील वाद्यांच्या ‘ब्रेक्स’वरून आलाय...‘ब्रेकिंग’ लढतीला ‘बॅटल’ म्हटलं जातं, तर खेळाडूंना ‘बी-बॉईज’ आणि ‘बी-गर्ल्स’ असं संबोधलं जातं...‘डीजे’द्वारे वाजविल्या जाणाऱ्या संगीतावर यात खेळाडू एकमेकांशी स्पर्धा करतात...
  • ‘ब्रेकिंग’चे तीन मूलभूत घटक म्हणजे ‘टॉप रॉक’, ‘डाउन रॉक’ आणि ‘फ्रीझ’...‘टॉप रॉक’ म्हणजे उभे राहून केलेल्या सर्व हालचाली. सामान्यत: हातांच्या शैलीदार हालचाली आणि पदन्यास यांचे संयोजन त्यात अंतर्भूत असते...
  • ‘फ्रीझ’मध्ये ‘रुटिन’च्या मध्येच ‘ब्रेकर’ असामान्य स्थितीत म्हणजे त्याच्या डोक्यावर किंवा हातांवर शरीर तोलत एका जागी स्थिर राहतो, थांबतो...
  • परंतु सर्वांत महत्त्वपूर्ण भाग आणि बऱ्याचदा कामगिरीचे ठळक वैशिष्ट्या राहते ते ‘डाउन रॉक’चे. यामध्ये जमिनीवर केलेल्या सर्व हालचालींचा समावेश असतो. यात ‘स्पिन’, पदन्यास, ‘ट्रांझिशन’ आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘पॉवर मूव्हज’ असतात...
  • ?पॉवर मूव्हज’ हा चालींचा एक जटील संच, ज्यात ‘ब्रेकर्स’ त्यांचे संपूर्ण शरीर हात, कोपर, पाठ, डोके किंवा खांद्यावर राहून फिरवून दाखवतात. या अॅक्रोबॅटिक हालचालींसाठी भरपूर शक्ती, संतुलन आणि लवचिकता आवश्यक असते...
  • पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 9 आणि 10 ऑगस्ट रोजी प्लेस डे ला कॉनकॉर्ड येथे या स्पर्धा होतील. यात प्रत्येकी 16 ‘बी-बॉईज’ आणि ‘बी-गर्ल्स’ना प्रवेश दिला गेलाय. पहिल्या दिवशी महिलांच्या, तर दुसऱ्या दिवशी पुऊषांच्या स्पर्धा होतील...
  • प्रत्येक दिवसाची सुऊवात एका साखळी टप्प्यानं होईल, ज्यामध्ये चार-चार गट असतील. प्रत्येक गटातील अव्वल दोन स्पर्धक उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. त्यानंतर उपांत्य फेरीच्या आणि पदकांसाठीच्या लढती रंगतील...
  • संगीत, शब्दसंग्रह, अस्सलता, तंत्र आणि अंमलबजावणी या पाच श्रेणींच्या आधारे पंच ‘ब्रेकर्स’चे मूल्यांकन करतील. प्रत्येक श्रेणी गुणसंख्येत 20 टक्के वाटा उचलते...
  • एक लढत तीन फेऱ्यांची असेल, ज्यांना ‘थ्रोडाउन’ देखील म्हणतात. ‘ब्रेकर’ला थ्रोडाऊनमध्ये ‘रुटिन’ पूर्ण करण्यासाठी प्रत्येकी 60 सेकंद मिळतात...खेळाडूंना गैरवर्तन केल्यास दंड ठोठावला जाऊ शकतो...
Advertisement
Tags :

.