For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खेळ जुनाच ओळख नवी ! बॉबस्ले

06:00 AM Jul 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
खेळ जुनाच ओळख नवी   बॉबस्ले
Advertisement

‘बॉबस्ले’...हिवाळी ऑलिम्पिकमधील आणखी एक खेळ, जो स्विस लोकांनी 1860 च्या दशकाच्या उत्तरार्धात शोधला. यामध्ये संघ गुऊत्वाकर्षणावर चालणाऱ्या स्लेडवर स्वार होऊन अऊंद, वळणावळणाच्या बर्फाच्छादित ट्रॅकवर सुसाट सुटतात...स्विस लोकांनी आधी ‘स्केलेटन’ खेळाचे दोन ‘स्लेड’ एकत्र जोडले आणि त्याला स्टीअरिंग यंत्रणेची तसेच श्रीमंत पर्यटकांना संरक्षण देण्यासाठी चेसिसची जोड दिली. 1897 मध्ये स्वित्झर्लंडमधील सेंट मॉरिट्झ येथे जगातील पहिल्या बॉबस्ले क्लबची स्थापना करण्यात आली...1952 साली स्पर्धक व स्लेडचं एकूण वजन मर्यादित करणाऱ्या नियमातील बदलानं खेळाला अॅथलेटिक स्पर्धेचं स्वरुप देण्यात मोलाचा वाटा उचलला...

Advertisement

  • या खेळाच्या सुरुवातीच्या शर्यतींत लाकडापासून बनविलेल्या ‘स्केलेटन स्लेड’चा वापर केला गेला. तथापि, त्यांची जागा लवकरच पोलादी ‘स्लेड’नं घेतली. आज जगातील अव्वल संघ ‘फायबरग्लास’ व पोलादापासून बनवलेल्या ‘हाय-टेक स्लेड’वरून बहुतेक करून कृत्रिम बर्फाळ ट्रॅकवर स्पर्धा करतात...ट्रॅकची लांबी सर्वसाधारणपणे 1200 ते 1300 मीटर इतकी असते...
  • 1924 मध्ये चामोनिक्स येथे झालेल्या पहिल्या ऑलिम्पिक हिवाळी खेळांमध्ये चार जणांच्या संघांची शर्यत झाली. 1932 च्या लेक प्लॅसिड गेम्समधून पुरुष गटातील दोन खेळाडूंच्या संघाची स्पर्धा जोडण्यात आली, जी आजपर्यंत कायम राहिलीय...पहिली महिला बॉबस्ले स्पर्धा 2002 मध्ये आयोजित करण्यात आली, ज्यात दोन महिलांचे संघ सहभागी झाले. लिलेहॅमर येथील 2016 च्या हिंवाळी ऑलिम्पिक खेळांपासून ‘मोनोबॉब’ या एकेरी प्रकारानं पदार्पण केलं...
  • ‘बॉबस्ले’ ही एक शर्यत असून त्यात अंतिम रेषेपर्यंत पोहोचणारा पहिला संघ विजेता ठरतो. स्पर्धेच्या प्रकारानुसार ‘बॉबस्ले वाहना’मध्ये दोन किंवा चार खेळाडू असतात आणि संघाचे कर्मचारी ट्रॅकवर प्रारंभी या वाहनांना ढकलतात...
  • बॉबस्ले वाहनं ही पूर्वीच्या तुलनेत आज खूप प्रगत झालीत...संघातील प्रत्येक व्यक्तीची विशिष्ट भूमिका असते, मग तो ‘पायलट’ असो, ‘ब्रेकमॅन’ असो किंवा ‘पुशर’ असो...
  • त्याशिवाय ‘स्टीअरिंग’ उपकरणं देखील महत्त्वाची असतात. प्रत्येक वाहनाच्या दोन्ही बाजूला दोन धातूच्या रिंग बसविलेल्या असतात. त्यामुळं ‘पायलट’ला वाहनास दिशा देण्याकामी मदत होते. उदाहरणार्थ जर वाहनाला डावीकडे वळवायचं असेल, तर पायलट डाव्या बाजूची ‘रिंग’ खाली खेचतो...
  • बॉबस्ले वाहनं सुसाट सुटताना ‘पायलट’नं ती ट्रॅकवर ठेवण्यासाठी काळजीपूर्वक आणि बारकाईनं स्टीअरिंग उपकरणं हाताळणं जसं आवश्यक त्याचप्रमाणं सुरक्षितपणे वळणं घेण्याच्या दृष्टीनं ‘ब्रेकमॅन’नं ‘ब्रेकिंग’ नीट सांभाळणं गरजेचं. त्यानं ट्रॅकवरील योग्य ठिकाणी ‘पॅड्स’च्या संचावर दाब टाकायचा असतो...
  • ऑलिम्पिकमध्ये प्रत्येक ‘बॉबस्ले’ वाहनाच्या वजनावर (संघ सदस्यांसह) मर्यादा पुढीलप्रमाणे असतात-चार पुऊष संघाच्या शर्यतीत 630 किलो, दोन पुऊष संघाच्या शर्यतीत 390 किलो अन् दोन महिला संघाच्या शर्यतीत 340 किलो...

- राजू प्रभू

Advertisement
Advertisement
Tags :

.