‘गेम ऑफ थ्रोन्स : एगॉन कॉन्क्वेस्ट’ येतोय
गेम ऑफ थ्रोन्स’ वेबसीरिजला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळाली होती. आता ही फ्रेंचाइजी लवकरच ‘गेम ऑफ थ्रोन्स : एगॉन कॉन्क्वेस्ट’ नावाने फीचर फिल्म म्हणून प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट 2029 मध्ये प्रेक्षकांना पाहता येणार आहे. गेम ऑफ थ्रोन्समध्ये शतकांपेक्षा जुन्या राजाच्या संघर्षाची कहाणी दाखविण्यात आाrल होती. गेम ऑफ थ्रोन्स : एगॉन कॉन्क्वेस्ट देखील राजनयिक ड्रामावर आधारित असेल. परंतु अधिकृत स्वरुपात याच्या कहाणीविषयी अधिक माहिती देण्यात आलेली नाही. परंतु हा टार्गेरियन राजघराण्याचा संस्थापक एगॉन प्रथम टार्गेरियन आणि त्याच्याकडून वेस्टरोसवर विजय प्राप्त करण्याच्या कहाणीवर आधारित असेल अशी अपेक्षा आहे.
एगॉन प्रथम वेस्टरोसचा पहिला टार्गेरियन राजा होता आणि त्यानेच विजय अभियानाची सुरुवात केली, ज्याने या खंडाचे स्वरुप बदलले होते. स्वत:च्या ड्रॅगन बॅलेरियन द ब्लॅक ड्रेडवर स्वार होत एगॉन स्वत:च्या बहिणी आणि पत्नी विसेन्या तसेच रेनीससोबत युद्धरत राज्यांना टार्गेरियन शासनाच्या अधीन आणण्यासाठी निघाला होता. गेम ऑफ थ्रोन्स साखळीच्या घटना अनेक शतकांपूर्वीच्या आहेत, ज्या एचबीओवर 8 सीझनपर्यंत चालल्या आणि याने प्रेरित स्पिन-ऑफ शो ‘ए हाउस ऑफ द ड्रॅगन’ आणि ‘ए नाइट ऑफ द सेवन किंगडम्स’ही तयार झाले.
गेम ऑफ थ्रोन्स : एगॉन कॉन्क्वेस्टचे दिग्दर्शन ओवेन हॅरिस करणार आहे. यापूर्वी त्यांनी एचबीओच्या ‘ए नाइट ऑफ द सेवन किंगडम्स’च्या एपिसोड्सचे दिग्दर्शन केले होते. तर या चित्रपटाची कथा ब्यू विलमन यांनी लिहिली आहे. चित्रपटाची निर्मिती वॉर्नर ब्रदर्स करणार आहेत. हा चित्रपट 6 जून 2029 रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
