सातारा शहरात दोन ठिकाणच्या जुगार अड्डड्यावर छापा
सातारा :
सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट आणि लक्ष्मी टेकडी परिसरात सुरू असलेल्या जुगाराच्या अड्ड्यावर सातारा शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार ९ रोजी बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील सार्वजानिक रस्त्यालगत असलेल्या टपरीच्या आडोशाला जुगाराचा खेळ सुरू होता. यांची माहिती मिळताच सातारा शहर पोलिसांनी छापा टाकून शुभम उर्फ जगिरा सत्यवान कांबळे (वय २७, रा. प्रतापसिंहनगर सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १ लाख ५ हजार ६०० रूपये रोख रक्कम, जुगाराचे साहित्य, एल.सी.डी.स्क्रीन, सी.पी.यु असा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार विकास मोरे करत आहेत.
याच दिवशी सदरबझार येथील लक्ष्मीटेकडी परिसरातील पाण्याच्या टाकीच्या आडोशाला जुगारावर छापा टाकून मंगलदास शिवदास बाबर (वय ५६, रा. लक्ष्मीटेकडी सातारा) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७ हजार ३८० रोख रक्कम व मुद्देमाल हस्तगत केला.