गंभीरची काटेरी प्रशिक्षण शैली भारतासाठी उपयुक्त नाही : पायने
वृत्तसंस्था/ मेलबर्न
गौतम गंभीरची ‘काटेरी’ कोचिंग शैली भारतीय संघासाठी चांगली न ठरू शकते आणि 22 नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत दमदार सुऊवात करण्यात अयशस्वी झाल्यास पुढचा कालावधी खडतर ठरू शकतो, असा इशारा ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार टीम पायनेने दिला आहे.
न्यूझीलंडकडून मायदेशातील मालिकेत 0-3 अशा अभूतपूर्व पराभवाचा धक्का बसलेल्या गंभीरच्या प्रशिक्षणाखालील संघासमोर आता पर्थ कसोटीपासून ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत बॉर्डर-गावस्कर चषक राखून ठेवण्याचे कठीण आव्हान आहे. त्यांनी मागील दोन मालिका येथे जिंकल्या. त्यावेळी त्यांच्याकडे रवी शास्त्राr होते. जे अप्रतिम प्रशिक्षक होते. त्यांनी एक उत्तम वातावरण तयार केले, ज्यामुळे खेळाडू उत्साहित झाले आणि ते झोकून देऊन खेळले. रवी शास्त्राr यांनी त्यांना स्वप्न दाखविले आणि हलक्या-फुलक्या, आनंददायी मार्गाने प्रेरित केले, असे पायनेने ‘सेन रेडिओ’शी बोलताना म्हटले आहे.
भारतीय संघ आता एका नवीन प्रशिक्षकाच्या हातात गेला आहे, ज्याची शैली खरोखरच काटेरी, खूप स्पर्धात्मक आहे. शिवाय प्रशिक्षणाच्या दृष्टीने ही चांगली गोष्ट नाही. परंतु मला चिंता वाटते की, ते भारतीय क्रिकेट संघासाठी उपयुक्त न ठरू शकते. जर प्रशिक्षकाचा पत्रकार परिषदेत एक साधा प्रश्न विचारला असता तोल जात असेल, तर पर्थवर भारताची सुऊवात चांगली न झाल्यास गौतम गंभीरसाठी हा उन्हाळा खूप खडतर जाईल, असे पायनेने म्हटले आहे.
पायनेची टिपण्णी नुकत्याच झालेल्या पत्रकारांशी संवादासंदर्भात आहे. त्यात गंभीरने विराट कोहलीच्या फॉर्मबद्दल रिकी पाँटिगने व्यक्त केलेल्या मतावर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले होते की, ऑस्ट्रेलियाच्या सदर दिग्गज खेळाडूने भारतीय क्रिकेटबद्दल काळजी करण्याची गरज नाही. त्यावर पाँटिंगने गंभीरचे वर्णन ‘अगदी काटेरी पात्र’, असे केले होते.
रिकी आता एक समालोचक आहे. त्याला मते व्यक्त करण्यासाठी पैसे दिले गेले आहेत आणि त्याचे मत योग्य आहे. विराटचा फॉर्म घसरत आहे, ही चिंतेची बाब आहे. पण माझ्या मते, सध्या भारताला भेडसावणारी सर्वांत मोठी चिंता रोहित शर्माची फलंदाजी किंवा विराट कोहलीची फलंदाजी नाही, तर त्यांचे प्रशिक्षक आणि दबावाखाली शांत राहण्याची त्यांची क्षमता याविषयी आहे, असे पायनेने पुढे सांगितले.