For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

माडखोल येथील गजानन होडावडेकर यांचे निधन

04:10 PM Jan 29, 2026 IST | अनुजा कुडतरकर
माडखोल येथील गजानन होडावडेकर यांचे निधन
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

माडखोल डुंगेवाडी येथील रहिवाशी गजानन रामचंद्र होडावडेकर (७२) यांचे गुरुवारी सकाळी गोवा बांबुळी रुग्णालयात निधन झाले. गेले आठ दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी गोवा येथून गावात आणल्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे दर्शन घेत होडावडेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माडखोल देऊळवाडी येथील रामचंद्र सलूनचे मालक साईनाथ होडावडेकर तसेच सांगेली प्राथमिक आरोग्य केंद्राचे लिपिक स्वप्निल होडावडेकर यांचे ते वडील होत तर माजी सैनिक सुरेश होडावडेकर आणि रेल्वेचे निवृत्त कर्मचारी दत्ताराम होडावडेकर यांचे ते भाऊ होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, दोन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.