For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

‘गजब रात’ प्रेक्षकांच्या भेटीला

06:46 AM Oct 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘गजब रात’ प्रेक्षकांच्या भेटीला
Advertisement

नेटफ्लिक्सने चालू वर्षाच्या प्रारंभी मनोज तिवारीच्या एका चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटाचे नाव ‘घुसखोर पंडित’वरून मोठा वाद निर्माण झाला होता, त्यामुळे तो त्यावेळी प्रदर्शित होऊ शकला नव्हता. चित्रपट निर्माते आणि नेटफ्लिक्सच्या विरोधात एफआयआर नोंद झाला होता. यानंतर चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता.

Advertisement

नेटफ्लिक्सने आता या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी जारी केला असून याचे नवे नाव ‘गजब रात’ ठेवण्यात आले आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मने याचा ट्रेलर शेअर करत ‘अनेक कहाण्या, एक पात्र आणि सत्य समोर आणण्यासाठी केवळ एक रात्र’ अशी कॅप्शन देत हा चित्रपट 23 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला आहे.

गजब रात हा मल्टी-स्टारर चित्रपट असून यात दिव्या दत्ता, अक्षय ओबेरॉय, साकिब सलीम आणि नुसरत भरुचा देखील दिसून येणार आहे. ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयीसोबत अक्षय आणि साकिबने लक्ष वेधून घेतले आहे.  ट्रेलरची कहाणी एका रात्रीत घडलेल्या घटनांवर आधारित आहे. नवी दिल्लीच्या मधोमध एका धावत्या कारमधून एका युवतीला बाहेर फेकले जाते, ज्यानंतर पोलीस सक्रीय होतात. परंतु घटनास्थळी पोहोचलेले पोलीस अधिकारी रुग्णवाहिका देखील बोलावत नाहीत असे ट्रेलरमध्ये दिसून येते.

Advertisement

Advertisement
Tags :

.