For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डीपफेक व्हिडिओप्रकरणी मुख्य आरोपी गजाआड

06:25 AM Jan 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
डीपफेक व्हिडिओप्रकरणी मुख्य आरोपी गजाआड
Advertisement

अभिनेत्री रश्मिका मंदानाशी संबंधित प्रकरण

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बॉलिवूड अभिनेत्री रश्मिका मंदानाच्या डीपफेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने मुख्य आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी 10 नोव्हेंबर रोजी एफआयआर नोंदवला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचा यापूर्वीही अनेक सायबर गुह्यांमध्ये सहभाग आहे. त्यानेच या अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडिओ बनवला होता. त्याने एका वृद्ध महिलेलाही डिजिटल पद्धतीने अशाच प्रकरणात अडकवल्याचे स्पष्ट झाले आहे.

Advertisement

6 नोव्हेंबरला सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. सदर व्हिडिओमध्ये रश्मिका मंदाना लिफ्टमध्ये दिसत आहे. याबाबत रश्मिकाने दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. आता पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे.

Advertisement
Tags :

.