गेलला 4650 कोटीचा नफा, महसुलातही वाढ
नवी दिल्ली : सरकारी गॅस कंपनी गेल इंडिया लिमिटेड यांनी आपल्या आर्थिक 2026-27 च्या दुसऱ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीने दुसऱ्या तिमाहीत 4650 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा प्राप्त केला आहे. कंपनी 3243 कोटी रुपये नफ्यामध्ये मिळवेल, असा अंदाज बाजाराने यापूर्वी व्यक्त केला होता. अंदाजापेक्षाही नफ्यामध्ये कंपनीने चांगली कामगिरी दर्शविली आहे. याचदरम्यान कंपनीने जुलै ते सप्टेंबर तिमाहीत 45 हजार 895 कोटी रुपयांची कमाई प्राप्त केली आहे. तिमाही आधारावर पाहता एकत्रित निव्वळ नफ्यामध्ये वाढ नोंदविली गेली आहे. मागच्या तिमाहीमध्ये 4292 कोटी रुपयांचा नफा कंपनीने प्राप्त केला होता. तर कमाई 38992 कोटी रुपयांची झाली होती. इबीटीडा मार्जिन वाढीसोबत 6412 कोटी रुपयांचे राहिले होते.
समभाग वधारला
गेल इंडियाचा समभाग शुक्रवारी शेअर बाजारात तेजीत असल्याचा दिसून आला. कंपनीचा समभाग 3.18 टक्के वाढत 170 रुपयांच्या भावांवर व्यवहार करताना दिसला. या मागच्या सत्रामध्ये समभाग 165 रुपयांवर बंद झाला होता. सकाळी 166 रुपयांच्या भावावर समभाग खुला झाला होता. इंट्राडे दरम्यान समभागाने 170 रुपयांपर्यंत झेप घेतली होती. कंपनीने यापूर्वी 186 रुपयांचा उच्चांकी भाव तर 134 रुपयांचा निच्चांकी भाव गाठला होता. कंपनीचे बाजार भांडवल मूल्य 1.12 लाख रुपये कोटी इतके झाले आहे.
