For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

परागच्या जागी गायकवाडला इंडिया ‘अ‘ संघात स्थान

06:25 AM Jun 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
परागच्या जागी गायकवाडला इंडिया ‘अ‘ संघात स्थान
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला श्रीलंकेत होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी भारत ‘अ‘ संघात जखमी रियान परागच्या जागी स्थान देण्यात आले आहे, असे बीसीसीआयने रविवारी सांगितले.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार पराग धोंडशिरेच्या दुखापतीसह आयपीएल खेळला होता आणि पुनर्वसनासह तो जवळपास तीन महिने संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे. भारत ‘अ‘, श्रीलंका ‘अ‘ आणि अफगाणिस्तान ‘अ‘ यांचा समावेश असलेली तिरंगी मालिका 9 जून रोजी सुरू होईल. पुरुष निवड समितीने श्रीलंकेत होणाऱ्या आगामी तिरंगी मालिकेसाठी भारत ‘अ‘ संघात ऋतुराज गायकवाडचा समावेश केला आहे. धोंडशिरेच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झालेल्या उपकर्णधार रियान परागच्या जागी त्याची निवड झाली आहे, असे बीसीसीआयने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. रियानच्या पुनर्वसनाचे व्यवस्थापन बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समार्फत केले जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Advertisement

सुधारित भारत अ संघ  :

तिलक वर्मा (कर्णधार), रुतुराज गायकवाड (उप-कर्णधार), प्रियांश आर्य, वैभव सूर्यवंशी, आयुष बडोनी, निशांत सिंधू, सूर्यांश शेडगे, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), कुमार कुशाग्र (यष्टिरक्षक), विपराज निगम, यश ठाकूर, युधवीर सिंग, अंशुल कंबोज, अर्शद खान, अनुकूल रॉय.

Advertisement
Tags :

.