इंडिया अ संघाच्या कर्णधारपदी गायकवाड
► वृत्तसंस्था / नवी दिल्ली
चालु महिन्याच्या अखेरीस भारतीय अ संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये ऑस्ट्रेलिया अ बरोबर त्यांचे चार दिवसांचे दोन प्रथम श्रेणी सामने खेळविले जाणार आहेत. या सामन्यांसाठी भारत अ संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाडकडे सोपविण्यात आली आहे. या संघामध्ये अभिमन्यु ईश्वरन आणि साईसुदर्शन यांनाही संधी दिली आहे.
भारतीय क्रिकेट संघ नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात बॉर्डर-गावसकर चषकासाठी 5 सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. या मालिकेत दोन्ही संघांची सत्वपरीक्षा ठरणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघामध्ये ऋतुराज गायकवाडला संधी मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. आता भारतीय संघामध्ये इशान किसनचे पुनरागमन अपेक्षित आहे. भारत अ संघामध्ये देवदत्त पडीकल, साईसुदर्शन, डी. इंद्रजित, अभिषेक पोरल, मुकेश कुमार, इशान किसन, रिकी भुई, नितीशकुमार रे•ाr, मानव सुतार, नवदीप सैनी, खलील अहम्मद, कोटियान आणि यश दयाल यांचा समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया अ आणि भारत अ यांच्यातील पहिला सामना 31 ऑक्टोबरला मॅके येथे तर दुसरा सामना 7 नोव्हेंबरला मेलबोर्न येथे होणार आहे.