For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतीय ऑलिंपिक पथक प्रमुखपदी गगन नारंग, पीव्ही सिंधू ध्वजधारक

06:43 AM Jul 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारतीय ऑलिंपिक पथक प्रमुखपदी गगन नारंग  पीव्ही सिंधू ध्वजधारक
Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

26 जुलैपासून सुरू होणाऱ्या 2024 च्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय पथक प्रमुखपदी नेमबाज गगन नारंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या स्पर्धेत भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू खेळाडूंच्या पथसंचलनात भारतीय ध्वजधारक राहिल.

लंडन ऑलिंपिक स्पर्धेत नेमबाज गगन नारंगने भारताला कास्यपदक मिळवून दिले होते. यापूर्वी भारतीय ऑलिंपिक पथकाच्या प्रमुखपदी महिला मुष्टीयोध्दी एम. सी. मेरी कॉमची घोषणा करण्यात आली होती. पण मेरी कॉमने आपल्या या पदाचा राजीनामा दिल्याने आता गगन नारंग यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे, अशी माहिती अखिल भारतीय ऑलिंपिक संघटनेच्या अध्यक्षा पी. टी. उषा यांनी दिली आहे. गेल्या मार्च महिन्यात मेरी कॉमची भारतीय ऑलिंपिक संघटनेने चीफ डी मिशन (सीडीएम) पथक प्रमुखपदी घोषणा केली होती. त्यानंतर मेरी कॉमने काही वैयक्तिक अडचणीमुळे आपल्या या पदाचा राजीनामा एप्रिल महिन्यात दिला होता, असेही पी. टी. उषाने सांगितले. ऑलिंपिकच्या इतिहासामध्ये पाठोपाठ पदके मिळविणारी पी.व्ही. सिंधू ही एकमेव भारतीय खेळाडू असून ती 26 जुलै रोजी होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेच्या उद्घाटन समारंभावेळी पथसंचलनात भारताची ध्वजधारक म्हणून राहिल. पॅरिस ऑलिंपिकसाठी भारताच्या किमान 100 अॅथलिटस्नी आपली पात्रता सिध्द केली आहे. पॅरिस ऑलिंपिकसाठी यावेळी भारताचे 21 नेमबाज सहभागी होत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.