For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

लाखो धारकऱ्यांच्या उपस्थितीत गडकोट मोहीम

10:40 AM Jan 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
लाखो धारकऱ्यांच्या उपस्थितीत गडकोट मोहीम
Advertisement

बेळगाव : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने यावर्षी 39 वी गडकोट मोहीम नुकतीच पार पडली. किल्ले रायरेश्वर ते किल्ले प्रतापगड या दरम्यान मोहीम काढण्यात आली. या मोहिमेमध्ये बेळगावमधील शेकडो धारकरी सहभागी झाले होते. बुधवार दि. 24 रोजी सायंकाळी रायरेश्वर गडावरील तुळजा भवानी आरतीने मोहिमेला प्रारंभ झाला. जांभळी जोर, श्रीक्षेत्र महाबळेश्वर आदी डोंगर-दऱ्यांमधून रविवार दि. 28 रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी सांगता झाली. यानिमित्त देशातील नामवंत व्याख्यात्यांनी युवावर्गाला मार्गदर्शन करून देशभक्तीचे बीज रोवले. यामध्ये पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ, पांडुरंगशास्त्री बलकवडे, दीपक करंजीकर, शिवरामपंत कार्लेकर, अश्विनीकुमार उपाध्याय यांची व्याख्याने झाली. सांगता समारंभाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार महेश लांडगे, आमदार नितेश राणे, आमदार मकरंद पाटील आदी उपस्थित होते. 32 मण सुवर्णसिंहासन निर्माण करण्यासाठी जागृती करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेब देसाई, सरसेनापती अशोक वीरकर, प्रवीण बाफना, कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे, राजू पुजारी यांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.