For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पाच लाख न दिल्यास घरावर धाड टाकण्याची धमकी; खंडणीप्रकरणी गडहिंग्लजमध्ये दोघांवर गुन्हा

01:32 PM Sep 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
पाच लाख न दिल्यास घरावर धाड टाकण्याची धमकी  खंडणीप्रकरणी गडहिंग्लजमध्ये दोघांवर गुन्हा
Advertisement

गडहिंग्लज : पाच लाख रुपयांची खंडणी मागून पैसे न दिल्यास घरावर धाड पडून मोठे नुकसान करण्याची धमकी दिल्याप्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अझरुद्दीन मस्तान बोजगर आणि अविनाश आप्पासाहेब ताशिलदार (दोघेही रा. गडहिंग्लज) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

Advertisement

याप्रकरणी मोहम्मद साद जावेद किल्लेदार (वय 22, रा. हट्टीबसवाणा रोड, गडहिंग्लज) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. गेल्या आठवडाभरापासून या प्रकरणाची शहरात चर्चा सुरू होती. किल्लेदार यांनी 17 सप्टेंबर रोजी दिलेल्या अर्जाची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

फिर्यादीनुसार, दोन्ही संशयितांनी एका संघटनेचे नाव सांगून त्याची भीती दाखवत पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. किल्लेदार आणि त्यांचे वडील धर्मगुरू म्हणून देत असलेल्या शिक्षणावर आक्षेप घेत ते बंद करण्यासाठी तसेच याबाबत कोठेही तक्रार करू नये, यासाठी पैशांची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

Advertisement

पैसे न दिल्यास घरावर धाड पडू शकते, मोठ्या संख्येने लोक येऊन घराचे नुकसान करू शकतात तसेच कॉलर पकडून पोलिस ठाण्यात नेले जाऊ शकते, अशी धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास हवालदार कुंभार करीत आहेत.

Advertisement
Tags :

.