For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जवानाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न! पत्नीसह अनोळखी इसमावर गुन्हा दाखल

06:16 PM Jul 19, 2024 IST | Abhijeet Khandekar
जवानाला विष पाजून मारण्याचा प्रयत्न  पत्नीसह अनोळखी इसमावर गुन्हा दाखल
Gadhinglaj Kolhapur poisoning
Advertisement

गडहिंग्लज प्रतिनिधी

Advertisement

शहरातील संकेश्वर रोड येथे राहणाऱ्या भारतीय लष्कर सेवेतील पतीला ठार मारण्याच्या हेतूने त्याचे हात, पाय, डोळे बांधून तोंड आणि नाकावाटे विष पाजून ठार मारण्याचा प्रयत्न उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली आहे. अमर देसाई (वय 39) असे या सैनिकाचे नाव असून पत्नी तेजस्विनी देसाई आणि अनोळखी इसमच्या विरोधात गडहिंग्लज पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे.

जम्मू येथे कार्यरत असणारे अमर देसाई हे सुट्टीसाठी गडहिंग्लजला आले होते. गुरुवार रात्री आपल्या दोन मुलासह दार बंद करून झोपले असताना ही संधी साधत पत्नी तेजस्वीनि आणि अनोळखी इसमाने संगणमताने त्यांना हातपाय बांधून नाक व तोंडावाटे विषारी औषध घातले. यावेळी अमर हे मोठमोठ्याने ओरडू लागले. शेजाऱ्यांना मोठा आवाज येताना त्यांनी बंद घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असताना अनोळखी इसम सोडवण्यास आलेल्या श्री. खाडे यांना मारहाण करून घरातून पळून गेला आहे. यावेळी अमर यांना उपचारासाठी उपचारासाठी कोल्हापूरला हलवले असून पत्नी तेजस्विनी देसाई आणि अनोळखी इसमाच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल झाली आहे या घटनेचा अधिक तपास सपोनी प्रशांत निशाणदार हे करत आहेत.

Advertisement

Advertisement

.