For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गडहिंग्लज कारखान्याचे चेअरमन डॉ. शहापूरकर यांचा पदाचा राजीनामा

02:08 PM Sep 03, 2024 IST | Abhijeet Khandekar
गडहिंग्लज कारखान्याचे चेअरमन डॉ  शहापूरकर यांचा पदाचा राजीनामा
Advertisement

गडहिंग्लज प्रतिनिधी

गेले काही दिवस गडहिंग्लज साखर कारखान्याच्या संचालक मंडळात धुसफूस सुऊ होती. यातून चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्यासाठी 6 सप्टेंबरला संचालकांची विशेष सभा बोलावली होती. पण त्यापूर्वीच सोमवारी चेअरमन डॉ. शहापूरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा साखर आयुक्तांकडे दिल्याने गडहिंग्लजच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Advertisement

कारखान्याच्या सार्वत्रिक निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि चेअरमन डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने विरोधकांचा पराभव करत संपूर्ण जागा जिंकल्या होत्या. सत्तेत आल्यानंतर चेअरमनपदी डॉ. शहापूरकर यांना संधी देण्यात आली. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याने पालकमंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा बँकेकडून 55 कोटींचे कर्ज कारखान्याला दिले होते. त्यानंतर गेल्यावर्षी कारखान्याचा गळीत हंगाम घेण्यात आला. या कर्जाच्या विनियोगाबाबत व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण यांच्यासह 7 संचालकांनी साखर आयुक्तांकडे तक्रार करत चौकशीची मागणी केली होती. ही चौकशी सुऊ असतानाच कारखान्याला 300 कोटींचे कर्ज ट्रस्टकडून मिळणार असल्याचे चेअरमन डॉ. शहापूरकर यांनी संचालक बैठकीत सांगितले.

कारखाना गळीत हंगामाची सुऊवात होण्यास काही दिवस असतानाही 300 कोटींचे कर्ज मिळण्याची आशा धुसर झाली होती. व्हा. चेअरमन चव्हाणांसह 6 संचालकांनी पालकमंत्री मुश्रीफ यांच्याकडे राजीनामे दिले होते. तर 11 संचालकांनी प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्याकडे तक्रार करत चेअरमन डॉ. शहापूरकर यांच्या सह्यांचे अधिकार काढून घेण्याबाबत सभेची मागणी केली होती.
त्याप्रमाणे 6 सप्टेंबरला संचालकांची विशेष सभा कोल्हापूरला बोलावण्यात आली होती. तत्पूर्वीच डॉ. प्रकाश शहापूरकर यांनी चेअरमनपदाचा राजीनामा साखर आयुक्तांकडे दिला आहे. या राजीनामा पत्रात व्हा. चेअरमनसह 5 संचालकांनी कारखाना सुरळीत चालू नये यासाठी संप करणे, कामात व्यत्यय आणणे, मशिनरीमध्ये हेराफेरी करणे, खोट्या तक्रारी करणे असे प्रकार केल्याचे म्हटले आहे. व्हा. चेअरमन व 5 संचालकांच्या वागणुकीमुळे कारखान्याचे आधुनिकीकरण व नवीन प्रकल्प चालू करणे शक्य वाटत नाही. शिवाय कारखाना 85 कोटींचे देणे लागतो, हे देणे कसे द्यावे याची अडचण असल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.

Advertisement

पूर्ण क्षमतेने कारखाना चालवणार
चेअरमन डॉ. शहापूरकर यांनी राजीनामा दिल्यानंतर येत्या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवणार असल्याचे व्हा. चेअरमन प्रकाश चव्हाण यांच्यासह संचालक प्रकाश पताडे, सतिश पाटील, विद्याधर गुरबे, विश्वनाथ स्वामी यांनी पत्रकातून सांगितले आहे. जिल्हा बँकेकडून 55 कोटी मिळालेले कर्ज टेंडर प्रक्रिया न करता डॉ. शहापूरकर यांनी खर्च केले. जुन्या मशिनरीचे साहित्य खरेदी केल्याचा आरोप या पाच संचालकांनी केला आहे. कारखान्याचे ऑडिट केले जात असून यात लवकरच सत्य बाहेर येणार आहे. 300 कोटी कर्ज आणणार असल्याचे सेंग आणत होते. सह्याच्या अधिकाराबाबत होणाऱ्या बैठकीपूर्वी चेअरमन यांनी आपली बाजू न मांडता, समर्पक उत्तर न देता त्यापासून पळ काढल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

Advertisement
Tags :

.