जी.जी.चिटणीसच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात
बेळगाव : ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्ट संचलित जी. जी. चिटणीस शाळेच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या. उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून नरेश अणवेकर, इंद्रनिल अणवेकर, मुख्याध्यापिका डॉ. नवीना शेट्टीगार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वागतगीताने झाली. पाहुण्यांचे स्वागत नवीना शेट्टीगार यांनी केले. प्रारंभी विद्यार्थ्यांनी पथसंचलन करुन पाहुण्यांना मानवंदना दिली. मान्यवरांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू शेजल भावी, वैष्णवी इतनाल, श्रेया गोलिहळ्ळी, मेहक बेस्ती, वैष्णवी नायक यांनी क्रीडाज्योत मैदानाभोवती फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द केली. क्रीडामंत्री ओमकारनाथ मोटगीने खेळाडूंना शपथ देवविली. पाहुण्यांनी खेळाचे महत्त्व सांगून पुढील वाटचालीला शुभेच्छा दिल्या. विनायक बिचोलकर, क्रीडाशिक्षक जयसिंग धनाजी, स्वाती घोडेकर, अश्विनी सराफ, कौमुदा जोशीसह इतर शिक्षक यावेळी उपस्थित होते.