महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भविष्यातील युद्ध अधिक धोकादायक

06:44 AM Mar 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वायुदल प्रमुख व्ही.आर. चौधरी यांचे वक्तव्य : एअरोस्पेस शक्तीशी संबंधित चर्चासत्रात संबोधन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय वायुदल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही.आर. चौधरी यांनी बुधवारी ‘भविष्यातील संघर्षांमध्ये एअरोस्पेस पॉवर’ विषयावरील चर्चासत्राला संबोधित केले आहे. भारताला भविष्यासाठी आतापासूनच तयार रहावे लागणार आहे. तसेच भविष्यात वेगळ्या पद्धतीने युद्ध लढले जाणार हे आम्ही स्वीकारण्याची गरज असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.

बालाकोट सारख्या मोहिमेने राजकीय इच्छाशक्ती असल्यास एअरोस्पेस शक्ती प्रभावीपणे शत्रूच्या सीमांच्या पलिकडेच नेण्यात येऊ शकते हे दाखवून दिले आहे. राष्ट्र रणनीतिक लाभासाठी अंतराळ-आधारित संपत्तींवर जलदपणे भरवसा करत आहेत. अंतराळाचे सैन्यीकरण आणि शस्त्रास्त्राrकरण एक अपरिहार्य वस्तुस्थिती ठरल्याचे चौधरी यांनी चर्चासत्राला संबोधित करताना म्हटले आहे.

मानवी इतिहासात आकाशाला अनेकदा आश्चर्य अणि संशोधनाचे क्षेत्र मानले गेले आहे. जेथे स्वप्नं उ•ाण करतात आणि सीमा विशाल निळ्या विस्तारात विलीन होतात. तरीही या शांततेमागे प्रतिस्पर्धेने भरलेले एक क्षेत्र असून तेथे हवाई वर्चस्वसाठीच्या प्रतिस्पर्धेने अनेक देशांच्या अस्तित्वाला आकार दिला आहे. तसेच अनेक युद्धांचे परिणाम निश्चित केले असल्याचे चौधरी यांनी नमूद केले आहे.

आम्ही या अज्ञात आकाशात नेविगेट करतो, वायुशक्ती राष्ट्रीय शक्तीचा एक प्रमुख घटक असून निसंशयपणे एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. राष्ट्रीय शक्तीचे प्रतीक, शांतता आणि सहकार्यासाठी एक उपकरण म्हणूनही वायुदल काम करणार आहे. भविष्यातील युद्ध वेगळ्या पद्धतीने लढले जाणार हे स्वीकारण्याची गरज असल्याची वायुदल प्रमुखांनी म्हटले आहे.

भविष्यातील संघर्षांच्या वैशिष्ट्यांमध्ये कायनेटिक आणि नॉन-कायनेटिक दलांचा एकत्रित वापर, उच्चस्तराची युद्धस्थान पारदर्शकता, मल्टी-डोमन संचालन, उच्चस्तरीय अचूकता, वाढलेली घातकता, सेंसर-टू-शूटर चक्राचे मिश्रण सामील असेल. बालाकोट सारख्या मोहिमांनी राजकीय इच्छाशक्ती असल्यास एअरोस्पेस शक्तीला प्रभावीपणे शत्रूच्या सीमेपलिकडेच युद्धाशिवाय, आण्विक दबावाशिवाय उद्दिष्ट पूर्ण करता येऊ शकते हे दाखवून दिले असल्याचे ते म्हणाले.

अंतराळा देखील सैन्य मोहिमांच्या संचालनासाठी एक महत्त्वपूर्ण क्षेत्र म्हणून समोर आले आहे. यात मुक्त संचार, नेव्हिगेशन आणि देखरेख क्षमता आधुनिक सैन्यदलांची कार्यक्षमता वाढविणार असल्याचे उद्गार वायुदल प्रमुखांनी काढले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article